उमरेड 2025: महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव उमरेड येथील पंडित दीनदयाल उपाध्याय नाट्यसभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सांस्कृतिक संध्येचा मुख्य आकर्षण ठरला तो महिलांचा समूह नृत्य स्पर्धा, ज्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. एकापेक्षा एक सरस नृत्य सादरीकरणांनी सभागृहात उत्साहाची लाट उसळली. या सोहळ्यात 12 नृत्य गटांनी सहभाग घेतला,
नागपूर, २०२५: जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर यांच्या वतीने तेली समाजातील विवाह इच्छूक युवक - युवतींसाठी वधू - वर परिचय मेळावा २०२५ आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य मेळावा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता सिव्हील लाइन्स येथील संस्थेच्या लॉनवर होणार आहे. या मेळाव्यामुळे तेली समाजातील तरुण - तरुणींना योग्य जोडीदार शोधण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होईल.
लातूर, ऑगस्ट 2025: लातूर शहरातील वीरशैव तेली समाजाने इयत्ता दहावी, बारावी, नीट, सीईटी, एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा 10 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित केला. या कार्यक्रमाने समाजातील शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले,
यवतमाळ : समाजात वावरतांना प्रत्येक नागरिकांची सामाजिक जबाबदारी असते. त्यामुळे समाजातील गुणवंतांचा गौरव होणे आवश्यक आहे. यशाला कोणताही शॉर्टकर्ट नसतो. यशासाठी सातत्यपुर्ण कठोर परिश्रम आवश्यक असते, विद्यार्थ्यांनो, यशाची गगणभरारी घ्या, हे आकाश तुमचेच आहे असे प्रतिपादन
20 जुलै 2025 रोजी वर्धा येथील संताजी सभागृह, कृष्णनगर येथे तेली समाजाच्या वतीने एक भव्य गुणगौरव आणि सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, यशस्वी उद्योजक आणि पीएचडी प्राप्त समाजबंधवांचा गौरव करण्यात आला.