Sant Santaji Maharaj Jagnade
नांदेड - तेली समाज शैक्षणिक संस्था, नांदेडच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण वामनराव पावडे मंगल कार्यालय, पुर्णा रोड, नांदेड असणार आहे. मुख्य प्रवर्तक मा. श्री दशरथराव गोविंदराव सावकार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे.
जळगाव - श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी अतिशय भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून मंडळाने विशेष संताजी मंगल मंडप उभारला आहे. या मंडपाचे व कलशाचे भूमिपूजन सोमवारी (दि. ८ डिसेंबर) जळगावचे ज्येष्ठ समाजसेवक शांताराम चौधरी यांच्या शुभहस्ते पार पडले.
सोनगीर, ता. ८ : धुळे शहरातील खानदेश तेली समाज मंडळातर्फे समाजातील दिव्यांग, विधवा, विधूर, घटस्फोटितांचे विवाह जुळवून भव्य विवाह सोहळा आयोजनाचा आदर्श उपक्रम राबविला जातो. शुक्रवारी (ता. ५) दोन घटस्फोटितांचा भव्य विवाह सोहळा समाजातील दानशूरांच्या सहकार्याने एकवीरादेवी मंदिराजवळ पार पडला. रेशीमगाठी जुळल्याने मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
८ डिसेंबरला शोभायात्रा, १७ डिसेंबरला पुण्यतिथी व कीर्तन सोहळाअमळनेर (जि. जळगाव)। संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथी यंदा अमळनेरमध्ये अतिशय उत्साहात साजरी होणार आहे. तेली पंच मंडळ, तेली युवक मंडळ व संताजी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नाशिक - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यंदा नाशिकमध्ये अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. श्री संताजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रणरागिणी महिला मंडळ व श्री संताजी युवक मंडळ (पंचवटी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा व अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.