Sant Santaji Maharaj Jagnade
नागपूर: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जवाहर विद्यार्थी गृहाच्या वतीने आयोजित तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला सिव्हिल लाइन्स येथील लॉनवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी भूषवले.
अमरावती: मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, समाज गौरव पुरस्कार, दसरा मिलन आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हर्ष मंगलम, शंकर नगर, हरिगंगा ऑईल मिल जवळ, अमरावती येथे अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला. हा सोहळा समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीचे प्रतीक ठरला,
महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा आणि संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंतांचा सत्कार समारंभ आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालय, जाजुवाडी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
20 जुलै 2025 रोजी वर्धा येथील संताजी सभागृह, कृष्णनगर येथे तेली समाजाच्या वतीने एक भव्य गुणगौरव आणि सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, यशस्वी उद्योजक आणि पीएचडी प्राप्त समाजबंधवांचा गौरव करण्यात आला.
हिंगोली: तेली सेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी कुरूंदा (ता. वसमत) येथील प्रख्यात समाजसेवक डॉ. कैलास परसराम बारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती नांदेड विभागीय अध्यक्ष प्रभाकर गाजरे यांनी जाहीर केली. सामाजिक कार्यात आपल्या विधायक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे