ठाणे, २०२५: श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांच्या वतीने तेली समाजातील विवाह इच्छूक युवक-युवतींसाठी ८वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य मेळावा रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मंगला हिंदी हायस्कूल ए.सी. हॉल, महाराष्ट्र बँकेसमोर, रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे (पूर्व) येथे होणार आहे.
शिर्डी २०२५: श्रीक्षेत्र शिर्डी, जिथे साईबाबांचा पवित्र पदस्पर्श लाभलेला आहे, तिथे अहिल्यानगर जिल्हा तेली समाज महासभा ट्रस्ट आणि शिर्डी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साई स्नेहबंध राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२५-२६ आणि श्री संत संताजी महाराज जगनाडे समाज भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे
जळगाव, 2025: श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ, जळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जळगावातील दादासाहेब श्री. शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल, एफ. सी. आय. गोडाऊन, गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ होणार आहे.
राजगुरूनगर : श्री संत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरिता पन्नास कोटींची मंजुरी मिळाली आहे, परंतु ती पुरेशी नसल्याने पाचशे कोटी रुपये तरतूद मिळवण्याकरिता सरकारकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी येथे केले.
भारतीय जीवन विमा निगमचे (LIC) उच्च श्रेणी सहाय्यक आणि महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा, आष्टी तालुका अध्यक्ष मा. श्री. धनराजजी हिरुडकर यांनी 30 जून 2025 रोजी वरुड शाखेतून सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांनी 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालात साकोली, गडचिरोली, आर्वी आणि वरुड येथे आपली सेवा दिली.