नागपूर :- संताजी नवयुवक मंडळ व संताजी नारीशक्तीतर्फे आयोजित समाज मेळाव्यात बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश देण्यात आला. सोमवारी क्वॉर्टरमधील संताजी सांस्कृतीक सभागृहात नुकताच समाज बांधवासाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार कृष्णा खोपडे, कवयित्री विजय मारोतकर, नगरसेविका मनीषा धावडे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान मारोतकर यांचा पोरी जरा जपून जा चाही प्रयोग सादर करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे, संचालन कृष्णा कांबळी यांनी केले. अरूण टिकले, ईश्वर बाळबुधे, नीलेश चांदेकर, श्रावण नागुलकर, गजू उर्फ, बंटी घनमोरे, दिनेश मस्के, रूपेश कांबळे, राजू झाडे, पंकज सावरकर, मंजू कारेमोरे, डॉ. पूजा धांडे, धनश्री इटनकर, प्रतिभा वैरागडे आदींनी कार्यकमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले 
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade