उस्मानाबाद-आज दि.६ रोजी शासकिय विश्रामगृह येथे तेली समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यातिथी साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.हि पुण्यातिथी प्रथम वर्ष असल्या कारणाने श्री मुकुंद कोरे महाराज यांच्या निवास्थानी करण्याचे ठरले.संताजी जगनाडे महाराजांच्या दि.१५ रोजी पुण्यातिथी दिवशी मुकबधीर अपंग मुलांना खाऊ वाटप करण्याचे व गरजु विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. तसेच समाजातील नोंदणी फाॅर्म वाटप करून लवकरात लवकर नोंदणी करून घेण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरले.
याबैठकिस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर ,सचिव अॅड विशाल साखरे , कोषाध्यक्ष महादेव मेंगले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री श्रीराम घोडके ,श्री महादेव राऊत (कळंब) , श्री लक्ष्मण निर्मळे,श्री मुकुंद कोरे, श्री अमोल सुरवसे, श्री जितेंद्र घोडके, श्री दत्तात्र्य घोडके (बीड ),श्री दिनेश बहिरमल (बीड) आदि समाज बांधव या बैठकीस उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade