बीडच्या माजी खासदार केशरकाकु सोनाजीराव क्षीरसागर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नगरसेवक भाऊसाहेब जगताप होते. राधाकिसन सिदलंबे, विश्वनाथ गवळी, कृष्णा ठोंबरे, साई शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सुरडकर यांनी केले. संतोष पवार यांनी आभार मानले. अनिल क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दत्ता भोलाने, रवी लुटे, रामेश्वर क्षीरसागर, आशिष लोखंडे, आकाश ठोंबरे, किरण वाळके, दत्ता सोनवणे, रमेश सोनटक्के, शुभम राऊत, सतीश नांदरकर, नीलेश सुरसे, अजय सोळंके, कैलास भालकर, नीलेश शास्त्री यांनी परिश्रम घेतले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade