तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराजांची जयंती मंत्रालय व सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक २६ डिसेंबरला सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या निर्णयामुळे तैलिक समाजात उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
संत जगनाडे महाराजांची ८ डिसेंबरला साजरी होणारी जयंती शासकीय कार्यालयांमध्ये साजरी व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा व समाजबांधवांच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. तसेच महासभेचे अमरावती विभागाचे सहसचिव रवींद्र हजारे व समाजबांधवांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धाचे खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्याकडे सदर मागणी लावून धरली होती. त्यांनी समाजातल्या सर्वस्तरातून होत असलेल्या या मागणीची दखल घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला. या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबरला परिपत्रक काढून संत जगनाडे महाराजांची ८ डिसेंबरला साजरी होणारी जयंती मंत्रालय व सर्व शासकीय कार्यालय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला. आता दरवर्षी ही जयंती शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade