( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
पुण्याच्या कस्तुरी चौकाला इतिहास आहे. या चौकातच बराच लांब पसरलेला भगतांचा वाडा. या वाड्यातले रत्नाकर उर्फ दादा भगत म्हणुन परिचित साने गुरूजींच्या चळवळीत वाढलेले. सामाजिक कार्याची आवड व धडपड असलेले. सुदुंबर्याच्या उत्सवात हिररीने पुढाकार घेणारे. घराजवळच्या विठोबाच्या मंदिराची सेवा करणारे असे श्रद्धावान गृहस्थ. त्यांच्याच पूर्वजांनी जंगली महाराज मठ उभारण्यात पुढाकार घेतलेला. घरी बरे चार पैसे साठवलेले. दोन पैसे चांगल्या कामास खर्च करणारे, म्हणुन लोक त्यांना आदरांने ओळखत असतात. ही दोन मंडळीी आपले रोजचे काम संभाळून जे शक्य आहे ते करणारी व आपआपल्या विश्वात रमलेली. याच मंडळींनी काही इतिहास घडविण्याचा विचार अलग अलगपणे केलेला. सुदुंबरे येथे एकत्र येणार पण अवाढव्य मेळाव्यात एकमेकांच्या ओळखी कुठल्या ? एकमेकाला समोरासमोर पाहिले तर ओळखणारसुद्धा नाहीत. अशी होती सुरूवात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade