संत श्री जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना 8 डिसेंबर ला निघणार भव्य दिव्य टू व्हीलर रॅली,संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन मनोज संतान्से यांच्या संपर्क कार्यालय नारळीबाग येथे आज करण्यात आले होते.या वेळी विचार मंथन करून संतश्री जगनाडे महाराज उत्सव समिती स्थापन करून टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात दि.8 डिसेंबर रोजी संस्थान गणपती राजाबाजार येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ होऊन मछली खडक, गुलमंडी मार्गे,टिळक पथ पैठण गेट,क्रांती चौक मार्गे,अमरप्रीत चौक,आकाशवाणी सेवन हिल मार्गे सेंट्रल नाका येथुन सिडको N-6 येथील कृष्णा ठोंबरे यांच्या निवास्थानी अभिवादन कार्यक्रम करून पुढे टीव्ही सेंटर मार्ग,जय भवानी नगर संताजी चौक येथे आगमन व समारोप तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत श्री जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.आजच्या या बैठकीला कचरू वेळंजकर,मनोज संतांसे,सुनिल शीरसागर, अनिल शीरसागर, गणेश पवार, शंकर चौथे, विनोद मिसाळ, विशाल नांदरकर, संतोष सुरूळे, संदिप हिरे, राजु वाडेकर, संतोष काकडे, आदींची उपस्थिती होती.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade