गतवर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली. मालेगाव महानगरपालीकेत उपायुक्त श्री.विलास गोसावी यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी रमेश उचित यांनी संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते.तुकारामांची गाथा त्यांनी लेखणीबध्द करून अमर केली असे सांगुन संतांचा विधायक मार्ग अंगिकारा असे आवाहन केले. याप्रसंगी लेखाधिकारी कमरूद्दीन, राजेश बडवणे, दगा चौधरी, रमेश चौधरी, दत्ता जाधव, आनंदा महाले, भगवान बागुल, राजेंद्र बागुल, पोपट चौधरी, गोकुळ चौधरी, संजय चौधरी, कमलेश सुर्यवंशी, राजेंद्र चौधरी, मधुकर गायकवाड, मोहन पवार, डॉ .अनुदास सुर्यवंशी आबा बागुल, दगा चौधरी, इ.उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade