परभणी येथील नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे रविवारी ता. ८ रोजी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या सर्व जि.शा.परभणी व महासभेच्या सर्व शाखीय च्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.संत श्री संताजी जगनाडे महाराजांवर संत श्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा प्रचंड प्रभाव होता.ते संत तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकर्यांन पैकी एक होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंग लेखनाचे काम संत संताजी जगनाडे महाराज यांनी केले होते.संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडविली ,तेव्हा संत तुकाराम महाराजांचे अभंग मुखोद्गतगत आसलेल्या जगनाडे महाराजांनी त्यांच्या अभंगाचे पुर्नलेखन केले होते.त्यांच्या संत चळवळीतील योगदानाची आठवन म्हणुन.महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून शासकीय स्थरावर जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत म्हनुण. श्री.ष.ब्रं.वेदान्ताचार्य १०८ सिध्ललिंग शिवाचार्य साखरखेरडेकर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी. मा नगराध्यक्ष बंडु पाचलिंग, जिल्हा आध्यक्ष भास्कर देवडे,ज्ञानेश्वर सरकाळे, फुलारी, शिवा साखरे, मनमथ देशमाने ,किरण क्षीरसागर,शिवलिंग खापरे, प्रल्हाद देवडे, आकाश भिसे,शंकर फुटके, लक्ष्मणराव चौधरी, पवन राऊत, गणेश मोरे संतोष माने, दिपक स्वामी, कल्याण नखाते, महेश डोंगरे, राऊत बबन कुर्हे ,राहुल राखे,आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade