अमरावती तेली समाजाच्‍या वतीने  खा. नवनीत राणा व गुणवंतांचा सत्कार

तेली समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा

    अमरावती : मी गुणवत्ता यादीत आलो, याची हवा डोक्यात जावू न देता विद्या विनयन शोभते या तत्त्वानुसार जगा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्‍हावा यासाठी प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन माजी मंत्री जगदीश गुप्‍ता यांनी केले.

Navneet Kaur Rana MP Amravati Satkar by Teli Samaj Amravati      श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे तेली समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा अभियंता भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. गुणगौरव सोहळ्याच्या व्यासपीठावर खा. नवनीत राणा, माजी प्रा -कुलगुरु वसंतराव जामोदे, माजी एसीपी दिलीपराव बिजवे, प्राचार्य अजय गुल्हाने, गंगाधरराव आसोते, प्रा.डॉ. प्रकाश पजगाडे, प्राचार्य डॉ. किशोर शिरभाते, प्रा.डॉ. केशवराव गुल्हाने, प्रा.डॉ. प्रफुल्ल अजमिरे, हरिदासपंत गुल्हाने, श्रीरामपंत सुखसोहळे, शंकरराव श्रीराव, मुरेशकुमार साह, प्रा.संजय आसोले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय आसोले यांनी करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आपल्या उद्घाटनीय भाषणात बोलतांना जगदीश गुप्ता म्हणाले की, विद्यार्थ्‍यानी अभ्यासासोबतच आपल्या कामात सातत्य ठेवावे. केवळ नोकरीसाठी अभ्यास न करता इतरही क्षेत्रात संधी शोधावी असा सल्‍ला देत आपण काय केले याचे विवेचन करावे असे जगदीश गुप्‍ता  यांनी सांगितले. यावेळी माजी प्र-कुलगुरू जामोदे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.  खामगांव येथील गो.से.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सु.प शिरभाते व प्रा. मनील जयसिंगरे यांनी केले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्याचे पालक व समाज बांधव उपस्थित होते.

     गुणवंतांचा गुणगौरव - गुणगौरव सोहळयात शैक्षणिक, क्रीडा व अन्य क्षेत्रात प्राविण्यप्राप्त केलेल्या तसेच स्पर्धा परीक्षांसोबतच इयत्ता १० वी व १२ वी मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

     खा. नवनीत राणा यांचा सत्कार -  गुणगौरव सोहळयात नवनियुक्त खा. नवनीत राणा यांचा तेली समाज बांधनांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना खा. राणा म्हणाल्या की, आपण ज्याप्रमाणे कष्‍ट केले, त्याप्रमाणे आपल्या मुलांना करण्याची सवय लावा. जेणेकरून तो कुठल्याही परिस्थितीचे चटके सहन करू शकतील. जीवनाला १०० टक्के द्या तरच १०० टके यश मिळेल असे सांगून आपल्या मुलांना सर्व गोष्टी सहज उपलब्ध करून देवू नका असे आवाहन खा.राणा यांनी केले.

Teli Samaj Amravati Navneet Kaur Rana MP Amravati Satkar

दिनांक 14-10-2019 20:08:37
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in