सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मेळाव्यात वधूवर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष हाडके यांनी केले. गजानन दळवी यांनी आभार मानले, सूत्रसंचालन मोहन विभूते आणि मनोज विभूते यांनी केले. स्वागत संतोष किर्वे आणि सोमनाथ धोत्रे यांनी केले. दरम्यान, विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade