होय कै. अमृत किसन पन्हाळे यांनी आपला इतिहास रचला.

    मी एक पन्हाळे, पुण्याच्या अंबेगावातून धडपडत पुण्याच्या शिवेतून आलेल्या. त्यांच्या जवळ होती फक्त निमगावच्या खंडोबाचा आशिर्वादाची शिदोरी. माझ्या पूर्वजांनी या पुण्यात येऊन आपले नशीब घडविले. पणजोबांनी बरोबर शुन्य आणले होते. पुणे लष्कर मधुन त्यांनी जुने फर्नीचर विकत घेऊन किरकोळ दुरूस्ती करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोखंडी भंगार व हातगाडी ओढली व जुने फर्नीचर ही घेत असत. अल्प काळात जम बसविला. व्यवसायात घोडदौड सुरू केली. प्लेगच्या साथीत प्लेग झाला आणि त्या प्लेगने पन्हाळे कुटूंबावर अवकळा आणली. पोलिसांचा ताफा घरात शिरला पण पणजींने प्रेत गोडाऊन मधल्या खुर्ची मध्ये दडवून ती लेकरांना पोटुशी घेऊन बसली. त्याकाळात हाडपसरच्या माळावर तिन दगड गोळा करून चुल पेटवली आपल दु:ख उरात ठेऊन मुले वाढवली धंदा बसला कर्जाच्या डोंगरात घरे गेली आणी वाट्यास आली भाड्याची खोली व मिळेल ती नोकरी. त्या वेळच्या पन्हाळे कुटूंबानी त्या शुन्यातून फिनिक्स पक्षा सारखी झेप घेतली. त्या दिवसा पासून ते सर्व मागचा संदर्भ डोळ्या समोर ठेऊन फर्निचर व व्यवसायात झेप घेऊ लागले झेप इतकी उत्तुंग होती की ती सर्वश्रेष्ठ ठरली. माझे अजोबा कै. किसन रामचंद्र पन्हाळे हे आपल्या व्यवसायात मग्न होते. ते वयोमाना नुसार गेले. 

Amrut Kisan Panhale     याच काळात कै. अमृत किसन पन्हाळे यांची वाटचाल सुरू झाली. त्यांना आम्ही सर्व नाना म्हणत आसतो. नानांचा जन्म म्हणजे सुख संपन्न पन्हाळे कुंटूंबात झालेला. नाना लहानाचे मोठे होत होते तेच वडीलांची करंगळी पकडून खडीच्या मैदाना जवळील नागेश्वर मंदिरात जात. अनेक वेळा ते एकटे त्या वयात जात. मंदिरात दूध दिले पाहिजे. हा नागेश्वर आपला आहे. त्याच्याच भरवशावर पन्हाळे कुटुंब आहे. कधी पायी कधी सायकलवर नियमीत जात असत. नाना देवभोळे नव्हते तर श्रद्धा ठेऊन कर्तव्य बजावणारे होते. रोज सकाळी उठून अंघोळ होताच देवघरात देवांना पुजल्या शिवाय दिवसाची सुरूवात होत नव्हती. सायंकाळी सर्वांना सोबतीला घेऊन भजन म्हंटल्या शिवाय त्यांना समाधान वाटत नव्हते. पुर्वजांनी जपलेला निमगावचा खंडाबा त्यांच्या अंतकरणात जपला होता. कुलदैवताला निमगाव येथे अनेक वेळा आम्हाला घेऊन जात असत. भवानी माता आम्हा पन्हळे कुटूंबीयाची कुलदैवता ही त्यांची श्रद्धा स्थाने.

    त्यांची वृत्ती धार्मीक जरूर होती. पण या विचाराच्या बैठकीला कर्तृत्व हवे असते. याची त्यांना पुरे पुर जाणीव होती. म्हणून ते जीवनभर उनीवा शोधून रचनात्मक प्रगती साध्य करीत होते. नाना जेंव्हा उमेदीच्या काळात होते तेंव्हाच्या आमच्या पन्हाळे कुटूंबाच्या ऑफीस मध्ये जात या वेळी त्यांनी सर्वांच्या अगोदर जावून झाडू हातात घेऊन ऑफीस साफ करावे सर्व कर्मचारी मंडळींच्या खुर्ची टेबल साफ करावे ही कामे आनंदाने केली. यातूनच ते घडत गेले नाना व्यवहारी चतुर होते. त्यांच्याकडे पन्हाळे कुटूंबाची धडपड, जिद्द व डोंगरा एवढे कष्ट घेण्याची जिद्द होती. या बळावर ते जीवनभर लढले व इतिहासात भर टाकून आपल कर्तृत्व व धडपडीचे सोनेरी पान तयार केले त्यावर त्यांच्या धडपड्या, जिद्दी मेहणती हातानी त्यांनी लिहीले किसन रामचंद्र ऑक्सीशीनीअर. घरातील कर्ती माणसे गेल्यावर सर्व जबाबदारी आली. त्याला ही त्यांनी यशस्वी पणे सामोरे जाण्यात धन्यता माणली. जेंव्हा आपला नवा इतिहास रचण्याची वेळ आली तेंव्हा नाना साठ वर्षाच्या दरम्यान होते. जवळ आर्थीक पाठबळ भक्कम नव्हते मुलाची साथ सोबत आशा वेळी त्यांनी किसन रामचंद्र ऑक्सीशीनीअर ही कंपनी सुरू करावयाची ठरवली. व्यवसायीक कंपनी सुरू करिताना लागणारे शासकीय परवानग्या मिळवून त्यांनी नव्या कंपनीच्या क्षैत्रात प्रवेश केला. मुळात नाना हे एक अजब रसायन वापरून  परमेश्वराने घडवीलेले व्यक्तीमत्व होते. त्यांनी कंपनी स्थापन्या पुर्वीच ध्येय निवडले. बारकावे प्रशासन, व्यवसायीक गणीते जवळ ठेऊन वाटचाल सुरू केली. कामाची हातोटी आपल्या ग्राहकाला जे नक्की काय पाहिजे त्यासाठी मेहनत यामुळे कंपनीची प्रगती आपोआप होऊ लागली. संबंधीतांची पसंती वाढू लागली. शासकीय, निमशासकीय कॉपरेट कंपन्या, खाजगी कंपन्या व ग्राहक या मधील एक सच्चा दुवा म्हणून कंपनी पहिल्या एक दोन वर्षात स्वत:चे चांगले फांऊडेशन करून उभी राहिली. ही उभी करण्याची किमया नानांच्या सारख्या प्रचंड बुद्धीमान व मेहनती माणसाची वाट चाल आहे. प्रशासन संभाळणारी कर्मचारी मंडळी माझे सोबती आहेत. त्यांना घडवून कारभार व्यवस्थीत ठेवणेे ही त्यांची प्रणाली आहे. आज ही त्यांच्या जवळ घडलेले कर्मचारी 25 वर्ष झाले तरी नानांच्या विचाराचा वसा प्रशासनात राबवतात. आपल्या या सोबत्यांना ते परके माणत नव्हते. नानांच्या गाडीवर एक ड्रायव्हर होता. तो साधारणत: 15 वर्ष कामाला होता त्याच्या अडचणीत त्याने नोकरी सोडली. पण जेंव्हा तो ऑफीसला भेटावयास आला तेंव्हा नानांनी त्याला आपल्या केबीन मध्ये बसवून विचारपूस केली. जाताना त्याच्या अडचणीचा संसार संभळावयास काही पैसे ही दिले. एवढी माया त्यांच्या जवळ होती. नाना मला नेहमी म्हणत मदत मी केली. कुणाला काय दिले हे देताना घरात विचारले नाही. आणी अम्ही ही चौकशी केली नाही. मुळात मी मदत केली ही वाच्याता करणे हे नानांच्या मुळात पाप वाटे. मी म्हणजे मी हा शब्द त्यांच्याजवळ नव्हता. मी म्हणजे आपण सर्व ही त्यांची माणसीकता होती. कुणाला घर दे, कुणाला फ्लॉट ला हातभार लाव, कुणाची बायको आजारी असेल त्याला मदत कर, रस्त्यावरील चकाट्या मारणार्‍या अल्पवयीन मुलाला जवळ बोलवून त्याला शाळेत पाठविणार त्याच्या शाळेचा खर्च ही शिक्षण घेई पर्यंत करणार. एक कर्मचारी ऑफीस मध्ये होता. त्याचा मुलगा हूशार होता. परंतू परस्थीती मुळे शिक्षण पुर्ण करू शकत नव्हता. नानांच्या हे लक्षात आले त्यांनी त्याला ऑफिस मध्ये बोलवले चर्चा केली व त्याला ंशिक्षणासाठी मदत केली. तोच मुलगा मुंबई येथे पीएचडी करीत आहे.

    इतिहास निर्माण करणार्‍यांना आपण इतिहासाचे घडनकर्ते आहोत याची पुसटशी जाणीव ही नसते तसेच नानांचे होते. मी केले हा मी पणा न ठेवता समोरच्या माणसाची अर्थीक, सामाजीक राजकीय उंची न पहाता ते त्याच्या जवळ जात असत. त्यामुळे समोरचा त्यांचाच होत असे. नाना श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू जरूर नव्हते. घरात ते जेवढे प्रेमळ होते आगदी तेवढेच ते शिस्त प्रिय होते. शिस्तीत जर भंग झाला तर ते खुप रागवत, खुप बडबड ही करीत पण तेच नाना पुन्हा प्रमोचा हात फिरवत असत. मला माणूस व त्याच्यातील मानवता शोधन्याची शिकवण दिली, शोधलेला माणूस आपलासा करून त्याला त्याच्या कामाचा मोबदला तर योग्य देणार पण त्याच्या सुख दु:खाचे ते वाटेकरी ही होणार. नात्यातील व गोत्यातील पै पाहूण्यांचा सहवास त्यांना हवा हवासा वाटे. त्यांच्या सुखाच्या वेळी एक वेळ जाणार नाहीत पण त्यांच्या अडचणीच्या वेळी नाना हजर असतील. दवाखान्यात नातलग अडचणीत आहेत म्हणताच ते ऑफिसला दांडी मारतील आणी दवाखान्यात थांबतील सोबत घरचा जेवणाचा डबा आजारी नातलगांसाठी घेऊन जातील. डॉक्टरांशी सबंधीत अजारा बाबत चर्चा करतील आपली मते मांडतील डॉक्टरांना कधी कधी आश्चर्यही वाटत असे. औषधाचे पैसे कुणी भरले हे फक्त डॉक्टर व नानांना महित असे. नाना धार्मिक होते नाना श्रद्धाळू होते परंतू नानांनी जातपात धर्म यात स्वत:ला  गुंतवून ठेवले नव्हते. मुसलीम, ख्रिश्चन बांधवांच्या सना दिवशी नाना केक वाटतील तो सुद्धा मुंबईच्या ओबेरॉय बेकरीचा ते मिठाई वाटतील आनंदाने व सर्वांच्या चेहर्‍यावरचा ओसंडणारा आनंद हेच त्यांचे समाधान असे.

Amrut Kisan Panhale     आमचे पुर्वज पुणे जिल्ह्यातील अंबेगावचे गावात एक तेली असुन गावात मान होता. गावाला अंधारातुन मुक्त करणार्‍या गाव देवळात दिवाबत्ती करून देवा समोरील अंधार नष्ट करण्याची जबाबदारी पूर्वजाकडे होती. गावाजवळ एक शेतजमीन सुद्धा होती. परंतू माझ्या पणजोबांचे वडील वारताच ते पुण्यात आले. आपण तेली आहोत याची त्याना जाणिव होती. श्री. संत संताजी जगनाडे महाराजांची पालखी सुरू करावयाची होती. तेंव्हा कै. दादा भगत, कै. धोंडीराम राऊत, कै. शरद देशमाने यांच्या सह पहिली मिटींग झाली. बैठकीचा सुरू पाहून नाना नाराज झाले. परंतू 4/5 दिवसात कामाला चालना मिळाली. मोजून 5/6 माणसांना बरोबर घेऊन जाणार्‍या या पालखीला प्रथम मदतीचा हात नानांनी पन्हाळे बंगल्यातून दिला. पालखी बरोबर एक पांढरा घोडा दिला व मदत केली. पुण्याच्या शिल्पकाराचे म्होरके व मा. उपमहापौर आबा बागुल यांच्या धडपडीतुन पहिला कुटुंब परिचय मेळावा झाला. या परिवर्तनात नाना हजर होते. आज वधुवर मेळावे भव्य दिव्य होतात. परंतू पहिला मेळावा 82 भवानी पेठ या समाज वास्तुत 1990 च्या दरम्यान झाला तेंव्हा या गावकूस (तेली गल्लीचा) वधु वर विशेषांक नाना व मा. जयदत्त क्षिरसागर यांच्या हास्ते प्रसिद्ध झाला. समाजाच्या विविध प्रक्रियेत नाना आपला व्याप संभाळून सामील होत असत. एक समाज बांधव म्हणुन ते हिररीने भाग घेत.

    नाना एक जिज्ञासू होते. जे नवीन आहे ते नक्की काय आहे हे समजून घेण्याची त्यांची आचार प्रणाली होती. आपल्या कंपनी संदर्भात शासकीय वाटचाल ते अत्मसाथ करीत व राबवीत त्यांचे स्वत:चे ग्रंथालय होते. इंग्रजी, हिंदी भाषेतील विवीध विषयावरील पुस्तके संग्रही होती. त्याचे वाचन करणे हा छंद होता. आपन काय वाचले यावर ते संबधीताशी चर्चा करून शंकांचे निरसन करीत असत. कडक शिस्तीचे नाना तेवढेच संवदेनाक्षम मनाचे होते. पार्टी हा त्यांचा अवडीचा भाग होता. वेगवेगळे पदार्थ करावयास लावणे ते सर्वांना देणे ही त्यांची पद्धत होती. पार्टीत ते विविध गाणी म्हणतील आणी उपस्थीतांना म्हणावयास लावतील विनोद सांगून वातावरण हास्यात ठेवतील.

    मी प्रथमच स्पष्ट केले आम्हा पन्हाळे कुटूंबाची नागेश्वरावर श्रद्धा मोठी. नाना तेथे लहान पणा पासुन जात असत. हा नियम त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. मंदिर एैतिहासीक पण जिर्ण होऊ लागले ट्रस्ट समोर विषय मांउला मंदिर जीर्णद्धार करावयाचा. नानांनी आपले योगदान समोर ठेवले परंतू त्याला गती येण्यास थोडा वेळ लागला. जीर्णद्धाराच्या सुरूवातीच्या प्रसंगी ग्रामीण भागात जसे गावजेवण असते अगदी तसा पुणेकरांना प्रसादाचा लाभ दिला. पण हे  दान सुद्धा स्वत:च्या नावे नव्हे तर एका राजकीय सहकार्याच्या नावे केले. मोठे पण स्वत:कडे घेतले नाही. मोठे पणा साठी काही करू नये मला जे पटले, भावले, आवडले ते मी केले याच ठिकाणी ते थांबत.

    मी व माझ्या दोन बहिणी यांना नानांनी आपल्या प्रेमळ व कडक शिस्तीत घडवीले. नम्रता, सेवा, त्याग व प्रामाणीक धडपड दिली. नाव व यश या साठी काही करू नका तुमची जिद्द, धडपड व वाटचाल पाहुनच तुम्हाला नाव व यश शोधत येईल. नानांना जावून एक वर्ष पुर्ण होत आले आहे. परंतू त्यांच्या संस्कारामुळे व आर्शीवादामुळे न अडखळता चालू शकलो. कारण नाना असे एक व्यक्तीमत्व होते की त्यांनी इतिहास वाचून नवा इतिहास घडवीला. त्यांनी किसन रामचंद्र ऑक्सीशीनीअर ही सुवर्ण अक्षरे कोरली. ती जोपासणे व वाढवणे हीच आम्हा सर्वांची खरी श्रद्धांजली ठरेल.

दिनांक 23-04-2020 23:08:37
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in