तेली समाजाचे महाराष्ट्राचे नेते मा.अशोककाका व्यवहारे,चांदवड यांनी आज खान्देश तेली समाज मंडळाच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.त्यांच्या सोबत चांदवड तेली समाज मंडळाचे पंच व पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने पत्रकार नरेंद्र बारकु चौधरी यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. उपस्थित सर्वांचे मंडळाचे कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अशोककाका यांनी मंडळाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वधु-वर सुचीचे कौतुक केले.समयसुचकता ओळखून खान्देश मंडळ काम करते.मंडळाचे सर्वच उपक्रम समाजहिताचे असतात.समाजाच्या विकासासाठी खान्देश मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच अग्रेसर असतात असे ते म्हणाले.मंडळाने नुकत्याच घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा व ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा चे त्यांनी कौतुक केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,योगेंद्र नामदेव थोरात,अमोल हिरामण चौधरी आदि उपस्थित होते.असे मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी यांनी कळविले आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade