शहिद नरेंद्र दाभोळकर, मोहन देशमाने आणि तेली समाज सातारा

सायगावच्या देशमाने बांधवांची महाराष्ट्रभर घोडदौड (भाग 2)

shahid Narendra Dabholkar & teli samaj mohan deshmane         तेलघाना घानवडीतुन उपसला घानवड मुजवली तेंव्हा जगण्याचे प्रसंग समोर आले. सातारच्या सदाशिव पेठेत हमाली करण्याची वेळ आली. ती हमाली करताना सातार्‍याजवळ खोजेवाडी येथे 9 वर्ष हायस्कुल वर शिपाई केली. ही शिपाईगीरी करताना गावा लगतच्या शाळे समोरील माणसांचे शेण उचलताना वेदनांचाकाहुर माजे. याच अवस्थेत लेखन हा छंद जडला या लेखनातुन पहिला लेख सन 1974 साली अकोला येथिल प्रगती मासीकात प्रसिद्ध झाला. नांदगीकरांच्या सहकार्याने बेळगांव येथे शिक्षक कोर्स पुर्ण केला. ते करीत असतानाच सातारच्या मातीत हजारो कविता शेकडो कथा लेख लिहीले पण प्रसिद्धी  फारच कमी. याच वेळी 1982 मध्ये सातारा येथे मासिक रजिस्ट्रेशन साठी प्रयत्न केले. अपयश आले. म्हणुन 1983 मध्ये पुणे येथे गावकुस नावे रजिस्ट्रेशन केले. पहिला अंक सुरू करताना सातार्‍या जवळील परळी येथील कै. शांताराम दळवी यांनी 250 रुपये रोख देऊन पहिली जहिरात दिली. अंक प्रसिद्ध समिक्षक शंकर सारडा यांनी आपल्या प्रकृतीक मुद्रणालयात मु्रद्रित केला सन 1983 च्या दिवाळी पाडव्या दिवशी सातारचे नगर वाचनालय निवडले. या वेळी श्री. शंकर सारडा, शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर, बाबुराव घोरपडे, एन. जी. गायकवाड, कॉ. रणजीत किर्वे मान्यवर उपस्थीत होते. सायगावच्या मोहन देशमाने यांनी आपली नोकरी संभाळत मासिकाची मुळे खोलवर रूजवली. प्रबोधन रचना व संघर्षया माध्यमातुन समाज मन घडविण्यास हे मासिक आधारस्तभ ठरले आहे. गत 33 वर्षात वधुवरांना मोफत प्रसिद्ध दिली जाते किमान 5 लाख वधुवरांच्या लग्न जमविण्यातील ही एक वाट ही चालवली. समाजीक व सांस्कृतीक विषयाला स्पर्श करणारी आज पर्यंत 22 पुस्तके मोहन देशमाने यांची प्रसिद्धी आहेत. यामध्ये श्री. संत संताजी महाराजांच्या चारित्र्याच्या आजपर्यंत 10 हजार प्रती समाज मनाजवळ 1 ते 5 रूपयात पोहच केल्यात. गावच्या ग्रामपंचायत सदस्य तेली होणे महाकठिण होते. त्यावेळी मंडल आयोग नेमल्या पासुन तो लागु होण्या पर्यंतच्या काळात लेखनी द्वारे जागृती केली. जे संविधानाने दिले ते मिळु नये या साठी ब्राह्मण व मराठा समाजाने जी कपट कारस्थाने केली त्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढणारे सायगावचे देशमाने होते व आजही लढतात. ओबीसी सेवा संघ या राज्य व्यापी संघटनेचे उपाध्यक्ष नुसते भुषवत नसुन अन्याया साठी लढतात या साठी चर्चापरिषद व साहित्य संम्मेलन ही आयोजीत करतात. या मुळे महाराष्ट्राच्या प्रक्रियेत सायगावची मोहर उमटून सातारचा संदर्भ अभिमानाने मांडतात.

दिनांक 28-11-2015 00:11:34
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in