पाम तेलाचा तडका नकोच, तळणाला हवे घाण्याचे तेल

आहारतज्ज्ञांची माहिती : तेल चांगले तर आरोग्य चांगले

    सध्या सणवारांचे दिवस आहेत, त्यामुळे घराघरांत तळण केले जाते. पण,गृहिणी तळण करताना चांगले तेल वापरत नसतील, तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी फिल्टर्ड तेलाचा वापर करावा, त्यातही शेंगदाणा किंवा घाण्याचे तेल वापरले तर ते अतिशय चांगले ठरू शकेल, असे आहारतज्ज्ञांनी माहिती दिली.

    आपण दररोज जे जेवण खातो, त्यात तेल चांगले वापरले तर आपले आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होते. पण, तेल योग्य नसेल, तर मात्र आजारांना निमंत्रण देण्यासारखे ठरते. घरगुती खाद्यपदार्थांमध्ये अनेक तेल बियांपासून व धान्यापासून तयार केलेले तेल वापरले जाते. त्यात शेंगदाणा, करडई,नारळाचे, सोयाबीन, राइसब्रेन, पामतेल, आदींचा समावेश होतो. पण, आपली संस्कृती मात्र लाकडी घाण्यावर बनविलेल्या तेल खाण्याची आहे. त्यामुळे शक्यतो सर्वांनी घाण्यावरील तेल वापरणे गरजेचे आहे.

 Lakdi Ghanyache oil    खरंतर घाण्याचे तेल सर्वात उत्तम असते. पर्वी घाणे खप होते; पण नंतर घाण्याचे तेल घेणं बंद होऊन पॉकेटमधील घेण्यात येऊ लागले. त्यामुळे घाणे बंद झाले. आता काही तुरळक ठिकाणीच घाण्याचे तेल मिळते. पॉकेटमध्ये येणारे तेल हे रिफाइंड तेल असते. जे रासायनिक व यांत्रिक प्रक्रिया केलेले असते. यात नैसर्गिक मूल्ये नष्ट होतात, जे खाली राहतो ते चव नसलेले तेल असते. ते पॉकेटमध्ये घालून विकले जाते. हे तेल खूप गरम केले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. रिफाइंड तेल बनविताना त्यात हायड्रोजन मिसळण्यात येतो. त्यामुळे नैसर्गिक फॅट काढले जाते. डायटच्या नावाखाली असे तेल विकले जाते. ज्याचा आरोग्याला काहीच उपयोग होत नाही. - डॉ. विनया दीक्षित, आयुर्वेदतज्ज्ञ

रिफाइंड तेलाने वाढतो वात

1) घाण्याचे तेल शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात. त्यामुळे शरीराला फायदा होतो. हे तेल वापरणे परवडत नाही म्हणून अनेकजण इतर तेल वापरतात. घाण्याच्या तेलाने प्रतिकारशक्ती वाढते. ते अपायकारक शरीराला नसते.

2) आयुर्वेदानुसार रिफाइंड तेल शरीरातील उवात वाढविते. त्यामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा, गुडघ्यांचे विकार, मणक्याचे विकार त्याने वाढतात.

अॅल्युमिनियम कढई वापरावी

    तळणासाठी वापरलेले तेल परत परत वापरूनये. शक्यतो अनेकजण लोखंडी कढई वापरतात, त्याऐवजी तळणासाठी अॅल्युमिनियमची कढई वापरावी. - डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ

दिनांक 04-10-2021 05:29:05
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in