दि. ०६ ऑक्टोबरला सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक, नागपूर येथे विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने जागतिक किर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा जयंतीचा कार्यक्रम मा. संजय शेंडे यांच्या अध्यक्षतेत आणि मा. विजय बाभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी अभियान मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीमान अनुज हुलके यांनी डॉ. मेघनाद साहा यांचे वैज्ञानिक, सामाजिक, राजकिय कार्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय नरखेडकर यांनी डॉ. मेघनाद साहा यांच्या विज्ञानवादी विचाराचा प्रचार प्रसार समाजात करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच देशातील शेतकरी आंदोलनाला क्रूरतेने दमन करणाऱ्या सरकारच्या धोरणाचा निषेध केला. त्यावर विजय बाभुळकर यांनी संघटनेच्या केंद्रीय कमेटीच्या वतीने एका दिवसाचे धरणे देऊन निषेध नोंदविण्याची सूचना केली. त्या करीता संघटनेच्या कार्यकर्त्यांना शेती विषयक कायद्याचे व शेतकरी आंदोलनाची अभ्यासपूर्ण माहिती मिळण्यासाठी २४ ऑक्टोबरला विदर्भ स्तरीय अभ्यास शिबीर घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच अभ्यास शिबीराच्या तयारी करीता दि. २० ऑक्टोबरला कार्यकर्त्यांची कोजागिरीचा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. श्री. ज्ञानेश्वर लांजेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade