नगर - महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक-अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था श्री संत संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आधिकृत फोटोचा वापर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
फोटो फ्रेम मिळण्यासाठी श्री संताजी फ्रेम वर्क, परसराम सैंदर, शिंपीगल्ली, तेलीखुंट, नगर. श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासमोर, नगर, ओंकार सुपर स्टोअर्स, महाजनगल्ली, नगर किंवा अधिक माहितीसाठी हरिभाऊ डोळसे (मो.९८२२२७१८०७) यांच्याशी संपर्क साधावा.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade