श्री संत जगनाडे महाराज यांच्या 397 जयंती निमित्त श्री चौंडेश्वरी मंदिर पुंडलिक नगर, गजानन नगर रोड, औरंगाबाद येथे जयंती सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम औरंगाबाद तेली समाज औरंगाबाद व संताजी महिला व पुरुष बचत गट औरंगाबाद. आयोजित केला होता त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमचे लाडके आमदार अतुलजी सावे साहेब, तेली समाजाची तडफदार नेते अनिल मकरिये, कृषी अधिकारी भागिनाथ कर्डिले, औरंगाबाद शहरातील उद्योजक व समाजसेवक महेंद्र महाकाळ, चेअरमन महापालिका शिक्षक पतसंस्था सौ बेबी अरुण राऊत, औरंगाबादच्या प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका सौ लक्ष्मीताई महाकाळ, वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ञ आपल्या समाजाला नेहमीच मदत करणारे डॉक्टर विजय दळवी तसेच डॉक्टर लक्ष्मीकांत शिरसागर, उपअधीक्षक भूमी अभिलेख औरंगाबाद श्री हरिभाऊ संतांसे, तसेच समाजाचे कार्यकर्ते राजेश जी शिंदे विठ्ठल जी पाखरे शिवा महाले, सुनील लोखंडे, कपिलदेव राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री सोमनाथ सुरडकर व ह.भ.प. श्री प्रभाकर म. बोरसे यांचे संताजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन झाले. तसेच लक्ष्मीताई महाकाळ समाजसेविका यांचे समाजाला मार्गदर्शन पर भाषण झाले त्यात त्यांनी समाजातील गटागटात अलग अलग न राहता समाजाने एकत्र येऊन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade