निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
निमगाव केतकी येथील पोलिस स्टेशन व ग्रामपंचायत कार्यालय येथेही श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पेढे वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान ग्रामीण रुग्णालयाम ध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रविण डोंगरे तसेच अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन देशमाने, निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिलिंद खाडे, बहजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग,युवा नेते महेश जठार, सुवर्णयुगेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र चांदणे, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, श्री गणेश पतसंस्थेचे चेअरमन किशोर पवार, मनोहर भिसे, कालिदास भिसे, सुभाष जठार, भारत शिंदे, नारायण देशमाने, प्रशांत भिसे, मुन्ना देशमाने, मयूर शिंदे, ओंकार भिसे, अमित भिसे, सुमित देशमाने, पवन देशमाने, अतुल गांधी, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप तसेच समाज बांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade