चंद्रपूर : लोकशाहीची यशस्वीता नागरिकांच्या सक्रियतेवर अवलंबून असते. भारतातील तेली समाज राजकारणापेक्षा व्यापारउदीमला महत्त्व देतो. लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून तेली समाजाने धाडसाने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे तालका उपाध्यक्ष गोविल मेहरकुरे यांनी केले.
यंग संताजी ब्रिगेड शाखेच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक वसंत देशमुख, माजी नगरसेवक आकाश साखरकर, रमेश भुते, अजय वैरागडे, नितेश जुमडे, जितेंद्र इटनकर, शिरीष तपासे, शैलेश जुमडे, विकास घटे, रामदास बनकर, भूषण देशमुख, दर्शन झाडे, मयूर बनकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
परंतु समाजाला राजकारणात स्थान तेली समाजाचा संख्येप्रमाणे दिले जात नाही. ही बाब अत्यंत खेदाची आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आहे. त्यामध्ये तेली समाजाला मोठ्या प्रमाणात स्थान मिळण्याकरिता राजकीय पक्षाने तिकीट देण्यासाठी युवकांनी सक्रिय व्हावे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade