अमरावती तेली समाज सर्व शाखीय राज्यस्तरीय भव्य वधू - वर परिचय मेळावा - २०२२

     श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती अध्यक्ष - प्रा.संजय आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) (र.सं. महा./१८७ -कार्यालय :- प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर, जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. संपर्क क्र. : ९९७०३८१८२४ तेली समाजाचा सर्व शारवीय राज्यस्तरीय भव्य उपवर-वधू परिचय मेळावा - २०२२ व "विवाह बंधन” परिचय पुस्तिकेचे विमोचन दिनांक ३0 जानेवारी २०२२ ला सकाळी १० वाजता स्थळ : संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड, अमरावती. 

      दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील उपवर मुला-मुलींकरीता विदर्भस्तरीय सर्व शाखीय भव्य उपवर-वधू परिचय मेळावा प्रा.संजय आसोले व सहकारी कार्यकर्ते, जेष्ठ, युवा, महिला समाजबांधवांच्या सहकार्याने आयोजीत केलेला आहे. समाजातील विवाह इच्छुक मुले-मुली व पालकांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.

    या प्रसंगी संस्थेतर्फे विवाहयोग्य उपवधू - वर परिचय पत्र असलेला संपूर्ण रंगीत "विवाह-बंधन" विशेषांक प्रकाशित करण्यात येईल. त्याकरिता ज्या इच्छुक पालकांना आपल्या मुलामुलींची माहिती (BIO-DATA) या विशेषांकात प्रकाशित करावयाची असेल त्यांनी आपल्या पाल्याची संपूर्ण माहिती, रंगीत फोटोसह (पासपोर्ट साईज) नोंदणी शुल्क रु.३००/- सह संस्थेचे छापील नोंदणी अर्जामध्ये भरुन श्री संताजी समाज विकास संस्थेचे कार्यालय प्लॉट नं.८, कलोती नगर, श्री नंदराजयादव यांचे घरासमोर, जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. येथे दि. २५ डिसेंबर २०२१ पूर्वी पोहचतील अशा रितीने संस्थेच्या छापील फॉर्म मध्ये किंवा संस्थेच्या ई-मेल वर विहीत नमुन्यात संपुर्ण माहिती भरुनवसुस्पष्ट रंगीत पासपोर्ट फोटो लावून देणगी शुल्कासह पाठवावी. अधिक माहिती करिता मागे नमुद केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा. या मेळाव्यास ज्या समाज बांधवांना मदत करावयाची असेल त्यांनी देणगी द्वारे किंवा प्रकाशित होणाऱ्या विशेषांकात जाहीराती पाठवून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे हि विनंती करण्‍यात आलेली आहे.

    आपणास माहितच आहे की गेल्या १२ वर्षापासून संस्थेचे उत्स्फूर्त कार्यकर्ते सातत्याने समाजाच्या संघटनाकरीता व समाजोपयोगी विविध उपक्रम जसे भव्य व अत्यंत उपयोगी व सर्वत्र लोकप्रिय असा उपवर-वधू परिचय मेळावा, परिचय पुस्तिकेचे विमोचन संताजी महाराजांचे गौरवार्थ संताजी दिनदर्शिका, संताजी पुण्यतिथी, विद्याथ्यांकरिता गुणगौरव सोहळा, विज्ञान उंद शिबीर, ज्येष्ठांकरीता आरोग्य शिबीर, ज्येष्ठांचे मंडळाची स्थापना, महिलांकरीता विविध उपक्रम, युवकांकरीता विविध उपक्रम, घटस्फोटीतांकरीता विशेष परिचय मेळावा व अन्य अनेक उपक्रम शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत व समाजातील सर्व घटकाकरीता राबवित आहे. परिचय पुस्तिका व परिचय सोहळा हा उपक्रम तर संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच सुरत, भोपाळ, इंदौर, रायपुर ईत्यादी ठिकाणच्या समाबांधवांत अत्यंत समाजप्रिय आहे व त्याची सर्वजण आतरतेने वाट बघत असतात.

    मागील दोन वर्षे संपुर्ण जगास वेठीस धरणाऱ्या कोवीड च्या महामारी मुळे मागील वर्षी कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन तसेच परिचय पुस्तिकेचे विमोचन संस्थेला करता आले नाही त्याकरिता आपण संस्थेला समजून घ्याल ही अपेक्षा, जानेवारी २०२२ मध्ये परिचय मेळावा व परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्याचे संस्थेने योजिले आहे. हा उपक्रमकोवीडची कुठलीही अडचण न येता सिद्धीस जाईल अशी आपण सर्वजण संताजी चरणी प्रार्थना करुया.

    सर्व समाजबांधव आमच्या समाजहितकारी उपक्रमांकरीता सदैव पाठीशी भक्कमपणे उभे असता वरहालयाकरिता आम्ही आश्वस्त आहोतच तसेच आम्ही सुद्धा आपणास हमीपुर्वक सांगु इच्छितो की, आपल्या विश्वासास आम्ही सदैव खरे उतरण्याचा पुर्ण प्रयत्न करु. पुनःश्च धन्यवाद! आपला सदैव नय, प्रा. संजय वा. आसोले (राष्ट्रपती पदक सम्मानीत) अध्यक्ष -  श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती

Amravati teli Samaj rajyastariya Teli Matrimony Vadhu Var Parichay melava form

Amravati teli Samaj Matrimony rajyastariya Vadhu Var Parichay melava form

दिनांक 19-12-2021 09:10:56
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in