श्रीरामपूर:- महाराष्ट्र तैलिक महासभे मार्फत आयोजित समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रेचे दिले.२० डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात आगमन झालं.बेलापूर रोडवरील जयबाबा प्रेससमोरील श्री.किरण वनदेव सोनवणे यांच्या घरी तेली समाज बंधू भगिनींनी रथयात्रेचे उस्फू्र्त स्वागत केले. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या त्यांच्या मुळ गावा - पासून दि.५ डिसेंबर रोजी सुरू झालेली समाज जोडो रथयात्रा कोकण, प. महाराष्ट् असा प्रवास करत शिर्डी, राहातामार्गे श्रीरामपूरात आली.
महिला भगिनींनी रथातील संताजी महाराजांच्या मुर्तींचे औक्षण केले. समाज बांधवांनी मुर्तीची पुजा केली.विशेष म्हणजे संताजी महाराजांच्या स्वहस्ते लिखित अभंग गाथेच्या दर्शनाचा सर्वांनी लाभ घेतला. रथयात्रेसोबत आलेले युवा आघाडीचे महासचीव श्री. नरेंद्रभाऊ चौधरी, राज्य समन्वयक श्री.सुनिलभाऊ चौधरी,श्री.विठ्ठलराव रणबावरे, श्री. संताजी महाराजांचे ११ वे. वंशज श्री. गोपाळशेठ जगनाडे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री. रमेशशेठ गवळी, मा. जिल्हाध्यक्ष श्री.भागवतराव लुटे,नासिक विभागीय सचिव श्री.रविंद्रजी कर्पे, अॅड.विजयराव साळुंके,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्री.चंद्रकांतशेठ शेजूळ आदि मान्यवरांचा जिल्ह्यातील लोकप्रिय सायंदैनिक जयबाबाचे कार्यकारी संपादक मा.श्री. मनोजकुमार आगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करून समाज जोडतो अभियानास शुभेच्छा दिल्या.श्रीरामपूर शहर तिळवण तेली समाज संघटनेच्या वतीनेही रथयात्रेसोबत आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.निलेश नागले व किरण सोनवणे तसेच महिला वर्गातून सौ.सिमा केदार, सौ. लताताई शिंदे मॅडम, सौ.उज्वलाताई चौधरी, सौ. मंगलताई साळुंके, सौ. कोते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यबाहुल्यामुळे श्रीरामपूर शहर तिळवण तेली समाज संघटनेचे अध्यक्ष अॅड.श्री.अनिल काळे, सोमनाथराव आढाव,श्रीकांत साळुंकेसर, राजेंद्र चोथे सर, डॉ.कवाडे व इतर उपस्थित राहू शकले नाहीत. तरी त्यांनी रथयात्रेस शुभेच्छा दिल्या. यावेळी सुभाषराव दळवी, वनदेव सोनवणे, जगन्नाथ कर्पे, शांतीनाथ काळे, रामनाथ म्हस्के, जगन्नाथ नागले, बापू शिंदे सर, आदि जेष्ठांसह सोमनाथ व शिवनाथ महापुरे बंधू,निलेश घोडके, प्रल्हाद साळुंके सर, योगेशराव कोते सर, सोमनाथराव राऊत, नंदकुमार राऊत, शिवाजीराव कोते, अनिल दळवी, प्रकाश काळे, गौरव चौधरी, प्रकाश लुटे, रामा भोज, अनिल चौधरी, संतोषराव वाडेकर, रोहित कर्पे आदि तरूण मंडळी उपस्थित होती.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade