अक्कलकुवा - अक्कलकुवा येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतीथी साजरा करण्यात आली.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतीथी पर साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानुदास चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संत ज्ञानेश्वर बहउद्धेशिय संस्थाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, सचिव मनोजकुमार चौधरी, समाजाचे ज्येष्ठ पंडित चौधरी, समाज बांधव योगेश चौधरी, पंकज चौधरी, राजेंद्र चौधरी, मानसिंग पाडवी, हर्षल बोरा हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मार्ट क्लासेस चे संचालक गोटूसिंग वळवी यांनी तर आभार प्रदर्शन ईश्वर वसावे यांनी केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade