दि. 26 जानेवारी 2022, भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने तिळवण तेली समाज, पुणे कार्यालयात, समाजभूषण आबा बागूल मा उपमहापौर पुणे म. न. पा, विद्यमान काँग्रेस गट नेते यांच्या हस्ते झेंडवंदनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री. विशालशेठ धनवडे, तिळवण तेली समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. घनशामशेठ वाळुंजकर, सर्व विश्वस्त मंडळ, पुणे शहर व उपनगरातील अध्यक्ष व समाज बांधव, आजी - माजी पदाधीकारी, समस्त तेली समाज बंधू - भगिनी शासनाच्या कोविड - १९ मार्गदर्शक तत्वे व त्रिसूत्रीचे पालन करून बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात तेली समाजातील क्रिडा क्षेत्रातील गोल्ड मेडालीस्ट सौ. ज्योती महेश भादेकर व प्रसन्न लक्षमण हाडके याची नँशनल पातळीवर निवड या उल्लेखनिय कामगिरीबद्दल मा.आबा बागूल यांच्या हस्ते सन्मानार्थीना गौरविण्यात आले. तसेच नव्याने तेल घाणा व्यवसाय सुरू करून नवीन पाऊल टाकलेल्या समाजबांधवाना प्रोत्साहित करणेसाठी सर्वांचा सत्कार व गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या व आभार प्रदर्शन व अल्पोपहार याद्वारे कार्यक्रमाची सांगता झाली.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade