गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांची सामाजिक सेवा या श्रेणीमध्ये तैलिक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संताजी सांस्कृतिक भवन, सोमवारी क्वार्टर बुधवार बाजार, सक्करदरा नागपूर येथे १२ जुलै रोजी युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महामेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून आसा ग्रुप ऑप कंपनीज चे अध्यक्ष डॉ. प्रशांत झाडे, प्रमुख अतिथी आमदार अभिजित वंजारी, पूर्व नागपूर आमदार कृष्णाजी खोपडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, रवीनगर अध्यक्ष रमेश गिरडे, तेली समाजसभा नागपूर जिल्हाध्यक्ष बाबूराव वंजारी, रा.तै. शा. महासभा राष्ट्रीय अध्यक्ष उमेश शाहू, म. प्रां. ते. महासभा सहसचिव बळवंत मोरघडे, नागपूर विभाग म. प्रां. पै. म.अध्यक्ष जगदीश वैद्य, म. प्रां. तै. महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, उपाध्यक्ष अनिल आष्टनकर, युवा फाउंडेशन संस्थापक प्रा. कुणाल पडोळे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचा समाजातील कर्तबगार महिला म्हणून प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तैलिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती म्हणून अभिनेता दत्तात्रय उबाळे तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच यूपीएससी, एमपीएससीमध्ये प्रावीण्यप्राप्त अधिकाऱ्यांचा तैलिक गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे या ५ वर्षे नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना तसेच आताही एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तेली समाजातील व इतर समाजातील महिलांना जागृत करण्यासाठी समाज संघटन, विजया महिला नागरी पतसंस्थांच्या संचालिका, अनेक महिला बचतगटाच्या अध्यक्ष असून बचतगटाच्या माध्यमातून महिलांची सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्याकरिता महिलांचे सक्षमीकरण करून अनेक गोर-गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे. तसेच कोरोनाकाळात बचतगटाच्या माध्यमातून गरीब, दलित व झोपडपट्टी भागात मोफत अन्यधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सरकारी दवाखान्यात तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना मोफत भोजन व्यवस्था व त्यांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी वाहनांची मोफत व्यवस्था तसेच नगराध्यक्ष असताना विकासकामे करून सामाजिक कार्य करण्यात आले. राजकारणापेक्षा समाज कारणाकडे जास्त भर देण्यात आला व इतरही सामाजिक कार्य केले व करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा तैलिक गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवयवक मंडळ संस्थापक सुभाष घाटे, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अतुल वांदिले, सं. ब्रि. ते. स. म. संस्थापक अजय धोपटे, ना.वि.महिला आघाडी अध्यक्ष नयना झाडे, युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीजचे सर्व सदस्य व तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade