अकोला, दिनांक ८ ऑगस्ट : श्री राठोड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. उदघाटक म्हणन आमदार रणधीर सावरकर होते, तर अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष बालमुकुंद भिरड होते. मार्गदर्शक म्हणून प्रशांत शेवतकर यांची उपस्थिती लाभली. यावेळी राठोड तेली समाज अध्यक्ष दिलीप नायसे, सचिव गजानन बोराळे, महिला अध्यक्ष पुष्पा वानखडे, अनिता भिरड, युवा आघाडीचे अध्यक्ष गोपाल झापर्डे, प्रकाश डवले, राजेश वानखडे, माणिकराव नालट, दीपक इचे, वसंतराव सोनटक्के, अॅड. देवाशिष काकड, माजी नगर सेवक शशिकांत चोपडे, नितीन झापर्डे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सावरकर यांच्या हस्ते समाज ज्येष्ठ समाजसेवक रामरावजी बोराखडे व नवनिर्वाचित संचालक निशांत मल्टी स्टेट बँक ॲड.देवाशिष काकड यांचा समाजभूषण म्हणून सत्कार करण्यात आला. प्रास्तविक गजानन बोराळे यांनी केले. राठोड तेली समाज अध्यक्ष दिलीप नायसे यांनी समाजातील शिक्षण क्षेत्रातील समाज बांधवाना आवाहन केले की, त्यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस व कॉलेज फीमध्ये सवलत द्यावी. त्याचवेळी डवले कॉलेजचे डवले यांनी समाजातील विद्यार्थ्यांना २५ टक्के फीमध्ये सवलत जाहीर केली. सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रथमतः दहावी व बारावीमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या १०८ विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यात आला. संचालन अनिल वानखडे यांनी केले. आभार राजेश वानखडे यांनी मानले.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade