जळगाव - जिल्ह्यातील समस्त प्रदेश तेली महासंघ व तेली समाज बांधव, भगिनींना, युवकांना वतीने दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या जळगाव जिल्ह्यात तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब जयदत्तजी क्षीरसागर साहेब व प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री विजय भाऊ चौधरी साहेब यांचे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव, गुणीजनांचा सत्कार व पदाधिकारी नियुक्ती पत्रे प्रदान करने असा भव्य दिव्य कार्यक्रम जळगाव येथे दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता, लेवा बोर्डिंग हॉल, टेलिफोन कार्यालयाजवळ होणार आहे.
जळगाव जिल्ह्यतील आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या माहितीतील जे विद्यार्थी सन 2021-22 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदविका तसेच विशेष परीक्षा शेकडा 70 व अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले असतील त्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपी जळगाव येथे खालील ठिकाणी पोहोच करावी व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी ही विनंती करण्यात आलेली आहे.
गुणपत्रक जमा करण्याचे ठिकाण
1) श्री प्रशांत सुरेश सुरळकर, यश झेरॉक्स पांजरा पोळ पाण्याच्या टाकीजवळ जोशी पेठ ,जळगाव 99 22 22 38 44
2) श्री विकी गोविंदा चौधरी, हॉटेल साई रेसिडेन्सी रेल्वे स्टेशन जवळ, जळगाव 95 95 94 52 79
सन 2020-21 या वर्षात स्थगित झालेला गुणगौरव सुद्धा याच तारखेला होणार आहे तरी सन 2020- 21 या वर्षात ज्यांनी गुणपत्रक जमा केले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून गौरव स्वीकारावा .
के डी चौधरी, सौ निर्मलाताई रामचंद चौधरी, सदानंद मधुकर चौधरी, राजेंद्र रामदास चौधरी, प्रशांत सुरेश सुरळकर, भागवत माणिकराव चौधरी, एडवोकेट वसंत शिवदास भोलाणे, एडवोकेट सुरज चौधरी, सुनील पंढरीनाथ चौधरी, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष व सर्व पदाधिकारी.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade