अश्‍वत्थाम्याची जखम आणि तेली संघटनेतील फूट

- भगवान बागूल (पत्रकार) मालेगाव (नाशिक) मोबा. - ९८२३३४०४०९

 समाजमित्रा,
    फार दिवसांपुर्वी मी 'अश्‍वत्थाम्याची जखम आणि तेली समाज' हा लेख लिहिला होता. स्वप्नात भिक मागण्यासाठी माझ्या घरासमोर उभा असलेला, कपाळावरील जखम वाहत असलेला, माशा घोंगावत असलेला अश्‍वत्थामास मी पुढे जा असे सुनावतो ! त्यावर चिडलेला अश्‍वत्थामा-तू तेली समाजसुधारक म्हणवतोस ना ? ‘ऐक, तुझ्या समाजाच्या जखमा’ असे म्हणून तेली समाजाचे सर्व दोष सांगू लागतो. असा त्या लेखाचा विषय होता. आजही त्या लेखातील अर्धे शिर्षक तसेच ठेऊन त्याच अश्‍वत्थाम्यामार्फत 'संघटनेतील ऊभी फुट, कारणे दुष्परिणाम 'याची मिमांसा त्याच अश्‍वत्थाम्याच्या तोंडून ऐकू या.

 A split in the Teli organization Ramdas Tadas versus Jaydutt Kshirsagar   खरे तर एखादे स्वप्न पडल्यावर पुन्हा तेच स्वप्न पडत नाही असे मला वाटते. भितीदायक स्वप्ने तर पुन्हा पडत नसावीत. पडलीच तर तो योगायोग असावा. आज पडलेले स्वप्न ही त्यातीलच एक असावे. यावेळी मात्र स्वप्नात मी जास्त भितीदायक स्थितीत असल्याचे जाणवले, कारणही तसेच हेाते.

    पुन्हा तोच भिकारी कपडे फाटलेला, काळा कभिन्य चेहरा असलेला, दाढी वाढलेला, कपाळावरच्या जखमेतून रक्तमिश्रीत पू वाहत असलेला, माशा घोंघावत असलेला, अश्‍वत्थामा आजही भिक्षापत्र घेऊन अंगणात ऊभा होता. मी बोलण्याआधीच तो म्हणू लागला-

   ‘काय तैलिक प्रबोधनकार, मागच्या वेळी सांगितले तसे घडले ना ? पडली ना पुर्ण देशभरात ऊभी फूट !’ त्याच्या भारदस्त आवाजाने विक्रम वेताळच्या संभाषणाची आठवण होऊ लागली. भितीचा अंगावर काटा उभा राहिला. तसं तर त्या भिकाऱ्याच्या बोलण्याचा माझ्या वैयक्तिक जीवनावर काहीच परिणाम होणार नव्हता. कारण त्याचे सर्व संदर्भ व भाकिते ही तेली समाजावर होती. त्यामुळे मी भितीच्या अवस्थेत जाण्याचे कारण नव्हते. पण तो पुन्हा म्हणाला, "आठवा सारे, काही वर्षापूर्वी मी हे वास्तव सांगितले होते. पण त्यावेळी दरडावून मला पुढे जाण्यास भाग पाडले." त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे म्हणून मी कुशी बदलली. पण तो बोलतच राहिला.

   ‘ऐकायचे अजून ? तेली समाजातील ऊभी फूटमुळे तुमच्या समाजाचे काय होऊ शकते? मी पुन्हा दुर्लक्ष केले. मी भिकारीच्या शब्दातील सत्यता तपासण्यासाठी त्याचा पौराणिक संदर्भ तपासू लागलो. त्याच्या शापवाणीत खरेच सामर्थ्य आहे? तो बोलतो तसे होऊ शकेल? अरे पण यात तुझ्या आयुष्याचा काय संबंध? तुला थोडीच या शापवाणीचा परिणाम होईल? आणि काय रे, तुच सांगतो ना ‘टेन्शन लेने का नही’. ज्या बाबीचा तुझ्याशी काडीमात्र संबंध नाही त्याची भिती तू कां बाळगतोस ?

   खरे तर त्याच्या अस्तित्वाबद्दल किळसवाण्या स्वरुपाबद्दल व त्याच्या दर्शनाने होणऱ्या मानसिक आघाताची अनामिक भितीच या प्रश्‍नांच्या भडीमारास कारणीभूत असावी. ‘कोण हे अश्‍वत्थामा ? तुम्हास काय माहित आहे त्यांच्याबद्दल ? मी स्वत:लाच विचारले.

   अश्‍वत्थामा, महाभारतातील प्रमुख पात्रातील एक पात्र. गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा व कुरु वंशाचे राजगुरु कृपाचार्य यांचा भाचा, गुरु द्रोणाचार्यने व पुत्र अश्‍वत्थामाने पांडवांना युध्दात जेरीस आणले. छिन्नविछिन्न केले. अशावेळी श्रीकृष्णान कूटनितीचा वापर करण्याचा युध्दिष्ठीरला सल्ला दिला. त्याने प्रथम अश्‍वत्थामा हस्तीस मारण्याचे भिमाला सांगितले. व अश्‍वत्थामा मेला अशी आवाई युध्दात पसरविण्यात आली. हे वृत्त कळल्यावर सत्यवचनी युध्दिष्ठीरच सांगेल म्हणून द्रोणाचार्य त्याच्याजवळ आले. तेव्हा युध्दिष्ठीर म्हणाला, अश्‍वत्थामा मेला पण नर का हत्ती? यात नरो वा कुंजरोवा हा शब्द श्रीकृष्णाने हळू बोलण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे युध्दिष्ठीरने केले व वाक्याच्या उत्तरार्धात श्रीकृष्णाने शंखनाद केला. त्यामुळे नंतरचा भाग द्राेणाचार्यास नीट ऐकू आला नाही व मुलगा मेल्याचे दु:ख घेऊन शस्त्रत्याग करुन शोकमग्न झाला आणि द्रोपदीच्या भाऊने त्याचा शिरछेद केला. आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामा ने पांडव पुत्रांचा वध केला. एवढेच नव्हे तर अभिमन्यू पत्नी उत्तराच्या गर्भातील  परीक्षितवर ब्रह्मास्त्र चालविले. अशा वेळी अर्जुनानेही ब्रह्मास्त्र चालविले. अश्‍वत्थाम्यास ब्रम्हास्त्र परत घेण्याचे ज्ञान नव्हते.

   माथ्यावरचा मणी गेल्याने तेजोहीन झालेला हा अश्‍वत्थामा ५००० वर्षापासून भळभळणारी जखम माथ्यावर वाहत आहे. युगानयुगे भटकत आहे. आणि तोच अश्‍वत्थामा माझ्या दुसऱ्यांदा स्वप्नात आला आणि तेही समाजाच्याच विषयावर बोलून माझी झोप मोडू लागला. ‘हे समाजसेवका, मी दुसऱ्यांदा तुझ्याकडे आलो. माझ्या जखमेवर तेल, हळद टाक. तुझ्याचकडे का आलो माहित आहे? तू ज्या तेली समाजाचे प्रतिनिधीत्व करतो त्या समाजाचे दैवत शनि महाराज आहे. त्याला तेल घालतात. तरी तेल हळदचे दान कर! त्या मोबदल्यात मी तुला तुझ्या समाजाचे वर्तमान व भविष्य सांगतो. तुला तेली समाजाचे प्रबोधन करण्यास फलदायी होईल.

    आता मी काहीच न बोलता कुशी बदलली. अश्‍वत्थामा पुढे सांगू लागला, ‘तुला माझ्या बोलण्यावर विश्‍वास नाही ना बसत? हा घे पुरावा! बघ समोर काय दिसते ते! ओळख हे कोणते मंदीर आहे? हे कोणते ठिकाण आहे? आज कोणती तारीख आहे? आजच्या तारखेला तुझ्या समाजात काय घडले? त्याचे दुष्परिणाम काय होतील? हे मी तुला समजून सांगेन.

   आता मला त्याची भिती वाटेनाशी झाली. तो माझ्या समाजासाठी सांगत आहे. आणि मीही ज्या समाजासाठी गेल्या ४0कार्य करीत आहे.त्याच्या हितासाठी धोका पत्कारुनही त्याचे ऐकणे भाग पडले.

    तो म्हणू लागला आज "तारीख ७ फेब्रुवारी २०२१. तुला जे मंदिर दाखविले जग प्रसिध्द शिर्डीचे मंदीर. लोक येथे चांगले व्हावे म्हणून साईबाबास मनोकामना व्यक्त करतात.
अश्‍वत्थामा पुढे बाेलू लागला - केंद्रीय संघटनेचे राज्यात दुसरी स्वतंत्र संघटनेची मुहूर्तमेढ केली. अर्थात असे होण्यास कारण घडले राज्यातील संघटनेची मुहर्तमेढ केली. अर्थात असे होण्यास कारण घडले राज्यातील संघटनेने मांडलेली स्वतंत्र चुल. ही दरी साधण्याचे प्रयत्न वेळीच झाले असते तर संघटनेत फूट पडली नसती.

    संघटना, १९६८ साली ओरिसा राज्याचे तत्कालीन राज्यमंत्री श्री. साहू यांनी देशव्यापी दौरा करुन संघटनेचे महत्व पटवून दिले व संघटना उभारणीची पायाभरणी केली. केशर काकूंनी त्याला व्यापकत्व दिले. पाठीच्या कण्याचा आधार दिला. त्यांना उपसंघटना मंजूर नव्हत्या. एकत्र प्रबल संघटना असावी ज्यामुळे राज्यकर्त्यांनाही धाक वाटावा, त्यांना समाजाचे प्रश्‍न सोडवावेत असे त्यांचे म्हणने असे.

    त्यांनी १० वर्षे हे पद सांभाळले, पूर्ण भारत पिंजला व संघटना बलवान केली. कर्करोगामुळे हे काम त्यांनी  सोडले, व त्याची सूत्रे मा. जयदत्तजी क्षीरसागर यांच्याकडे आली. त्यांनी या पदाला परेपुर न्याय दिला हे मी मागील लेखात म्हटले आहेच.

    अर्थात संघटनेत फुटीची काही बीजे नागपूर मेळाव्यात रुजली गेली. ‘श्रेयवाद’ हे त्यास प्रमुख कारण घडले. सुदुंबरे व नागपूर मेळाव्याने राजकीय ताकद साहेबांना म्हणजे शरद पवारांनाच दाखविण्यात खर्च झाली. त्याचा प्रसाद म्हणून शरद पवारांनी श्री जयदत्त अण्णांना मंत्रीपदे दिली. पण त्या व्यतिरिक्त समाज बांधवांच्या पदरात काही पडले नाही. एवढा मोठा समाज एकाच पक्षाच्या दावणीला बांधणे योग्य नव्हते. त्यातच मा. नरेंद्र मोदींचा भारतीय राजकारणात उदय. त्यातही ते तेली समाजाचे ! त्यामुळे ही सहानुभूती राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये रुपांतरीत झाली. प्रादेशिक पक्षाकडून तिचा प्रवास राष्ट्रीयकडे होऊ लागला. अर्थात शरद पवार हे राजकारणात विश्‍वासार्ह कधीच नव्हते. वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सत्ता मिळवली त्यांच्यावरच विश्‍वास अण्णांनी ठेवला ही चूक केली व राजकारणासाठी ज्यांनी घराणे फोडली त्यातच अण्णांनी निष्ठा वाहिलेली असताना ही अण्णांचे घराचे फोडून उपकाराचा प्रसाद दिला."

    अशा प्रकारे संघटना फुटीस राजकारणाची बाजू असली तरी पदाचा समाजाला काय उपयोग? हीही कसोटी वापरलेली दिसते. जसे कर्डीले यांना  खा तडस यांनी मागासवर्ग आयेगाचे सदस्यत्व मिळवून दिले तसे तुम्ही काय केले! असा प्रश्‍नही ही खदखद वाढविण्यास कारणीभूत झाला. त्यात प्रादेशिक नाणे जुने झाले व राष्ट्रीय नाण्यास सर्वाधिक महत्व प्राप्त झाले.

    ‘श्रेयवाद, पक्षवाद, समाजासाठी काय? या कारणाबरोबरच अस्तित्ववाद जो एक राजकारणातील एक घटक असतो तोही कारणीभूत ठरला. राजकारणात पद वाटतांना तुम्हास कोणत्या आधारे तिकिट द्यावे हा प्रश्‍न विचारला जातो. लोकशाहीत डोकी मोजली जातात, त्यामुळे तुमच्यामागे उभे डोकी किती? म्हणजेच सामाजिक पाठबळ महत्वाचे असते. त्यासाठीही संघटनेची फूट पडली. म्हणजेच राजकीय अस्तित्व हे फुटीस कारणीभूत झाल्याचा प्रामाणिक अंदाज आहे.

    'अजूनही संघटनेची फूट रोखता येईल काय? 'अशा माझ्या प्रश्‍नास अश्‍वत्थामा म्हणाला, "होय ,रोकता येऊ शकते. स्वत:चा अहम सोडून हिराकाका, अशोककाका, प्रा. वसंतराव कर्डीले यांनी विजय वडेट्टीवारांना सांगून एकत्र बैठक घेऊन खा. तडस व जयदत्त अण्णा यांच्यात समझोता झाला तर हे शक्य आहे."

    फुटीची चिन्हे दिसण्यावर मी अशोककाकांना फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले, 'खा. तडस व जयदत्त अण्णाूयांनी एकत्र बसून प्रश्‍न सोडवायला हवा. ' शिवाय ज्या काकूंनी ही संघटना बलवान करण्यासाठी एक सूत्र वापरले ते म्हणजे इतर लहान संघटनांना शिर्ष संघटनेत आणा. मला आठवते एका बैठकीत त्यांनी खा. तडसांना सांगितले, विदर्भ तैलिक महासंघ विसर्जित करुन त्यांना तैलिक महासभेत घ्या. मग आत्ताच का ? विघटनाची वाट धरावी ! काकूंच्याच सूत्राने जयदत्त अण्णांनी पुढाकार घेऊन एकजीव व बलवान संघटना निर्माण करावी. स्वप्न बरेच सांगणे होते.

आता अश्‍वत्थामा मला संघटनेतील उभी फुटीचे दुष्परिणाम सांगू लागला. तुला याचे भविष्यातील दुष्परिणाम ऐकायचे ? ऐक मग

१) राजकीय ताकद - या विघटनाने सर्वात म्हणजे राजकीय ताकद कमी होईल म्हणजे आमदार- खासदारांची संख्या कमी होऊ शकेल.

२) तेली विरुध्द तेली- राजकारणात तेली विरुध्द तेली असा प्रकार घडू लागेल ज्याची समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.

३) गटबाजी वाढेल - गावागावात यामुळे गटबाजी वाढू शकेल. तेली बघुत विदर्भात या दुहीचा परिणाम इतर पक्ष वा समाज घेऊ शकेल.

४) मतभेदांचे रुपांतर मनभेदात-असे रुपांतर होऊ शकते. तुम्ही व्हाट्‌सॲप ग्रुपवर राजकीय विरोधाच्या पोस्ट पहात असाल तर याचे प्रत्यंतर येईल. शाब्दीक बाचाबाचीचे रुपांतर मतभेदात होऊ लागते.

५) युवा व महिला संघटन परिणाम - मुळात संघटनेच्या स्थापनापासून या दोन मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे संघटना गतीमान होऊ शकली नाही. मुळातच क्षीण झालेल्या या संघटना आणखीण क्षीण होइल.

६) धार्मिक कार्यक्रम परिणाम : या संघटनांची पाळेमुळे गावागावात पोहचली तर त्याचे सर्वात वाईट परिणाम होतील. एक गट संताजी पुण्यतिथी तर दुसरा गट संताजी जयंती मनवेल.

७) गटबाजीचे प्रदर्शन- गावागावात दोन संघटनांची बोर्ड म्हणजे आंबेडकरी संघटनांसारखे त्याला स्वरुप येईल.

८) सामाजिक समस्यात वाढ - पाच बोटे एकत्र आली की मूठ बतने. तिला ताकद प्राप्त होते. तद्‌वत सामाजिक संघटनचे असते. मात्र विघटीत समाजाच्या सामाजिक समस्यांत वाढच होते. रामभाऊ तेलीचे शरद पाटीलशी भांडण झाले तर शेजारीच असणारा परंतु दुसऱ्या संघटनेचे काम करणारा वसंत तेली मदतीला धाऊ शकणार नाही.

९) सामाजिक आदर कमी होईल. तेली, चौधरी म्हणजे न्यायाधिश ! अशा या समाजात फूट? यामुळे इतर समाजात आदर कमी होईल.

१०) व्यवसाय वृध्दीस अथडळा होऊ शकतो.

११) गटबाजी वाढेल- गटबाजी नेहमीच संघर्षाला आमंत्रण देते. वृत्तपत्रातील बातम्या वाचा म्हणजे समजेल.

१२) असंघटित समाजाचे असंख्य दुेपरिणाम भोगावे लागतात. त्याचा इतिहास आठवा, राजपुतातील वैमनस्यांमुळे मोगल राज्यकर्ते भारतात स्थिरावले व सम्राट बनले.

१३) राजकीय दबावाने सुसंघटित समाजाची जी .कामे चुटकीसरशी होतात ती यापुढे होणार नाहीत.

14) समाजाच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होईल.जसे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेली समाज वसतिगृह गरजेची आहेत,अजून ती कुठेच नाहीत,म्हणून तेली समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळू शकत नाहीत, या व अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल...

15).... गटबाजित..सर्व शक्ती मी मोठा की तू यात जाते,असे प्रकार वाढतील.

16) इतर समाजात या गटबाजीचे हसू होईल.

17) कोणतीही बलवान संघटना उभारणीस काही वर्ष जातात,उभी फूट मुळे ती दही हांडीतील थराप्रमाने पूर्ण कोसळते. आज शिवसेनेची जी हालत झाली तसे तिचे होते.तिला नव्याने उभारणीस पुन्हा एक दोन पासून सुरवा त करावी लागते.

18) बलशाली संघटनेस मुजरा होतो, मान राहतो दुर्बल  संघटनेला नाही

19) सामाजिक प्रगतीची साखळी तुटते

20) स्पर्धेत इतर समाज पुढे जातात,ते या दुहीचा फायदा घेतात आदी कितीतरी तोटे सांगता येतील. आता तरी माझ्या जखमेवर तेल हळद टाक,अशी विनवणी अश्वत्थामा मला करू लागला. अश्या अवस्थेत मी त्याच्याशी धाडसाने बोलण्याचा निर्णय घेतला."अश्वत्थामा महाराज, मला माझा तेली समाज प्रणाहून प्रिय आहे.,पत्रकारिता व समाजसेवा मी 1976 पासून सुरू केली. तेली समाजाच्या 16 मासिकात लेख लिहून जागृतीचे प्रयत्न केले. केशर काकुंमुळे आम्ही या संघटनेत झोकून दिले,उत्तर महाराष्ट्र मेळावा ही मालेगाव ला घेतला,संघटनेत पूर्ण राज्यातील बैठकींना हजर राहून मार्गदर्शनही केले.आज माझ्या समाजाच्या संघटनेत इंग्रजीतील टू बी च्या रुपप्रमाने  होत असलेली विभागणी मन विदीर्ण करते.मी तुझ्या जखमेवर तेल हळद टाकतो,पण मला माझ्या प्राणप्रिय तेली समाजाच्या पुन्हा एकत्रित येण्याचा व पुन्हा काकूंच्या स्वप्नातील बलशाली संघटना उभारणीचे मार्ग सांगशील ?मला हा मार्ग हवा होता म्हणून मी खूप धाडसाने त्याच्या जखमेवर मी तेल हळद लावली.जखमेवर गार वाटल्यावर बरे वाटल्यावर तो पुन्हा म्हणू लागला हे "संताजी पूत्रा ,ऐकतर मग, समाजातील सक्रिय घटकच दबाव टाकून यांना एकत्र करू शकतील. गावागावातील शहरा शहरातील स्थानिक मंडळ यांनी या दोन्ही संघटनांवर ,नेतृत्वावर दबाव टाकावा व एक संघ होण्यास मजबूर करावे. समाजाची इच्छा पाहून या दोन्ही संघटना एक होऊ शकतील .त्यासाठी पत्रांचा भडिमार करावा. त्यासाठी सर्व मार्ग अवलंबावेत . समाजातील थिंक टंक सक्रिय होऊन एक संघ समाज संघटन साठी प्रयत्नशील व्हावे .विशेषता युवा वर्गाने आपली सर्व शक्ती आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून या बाबीस महत्त्व द्यावे. हे व या सारखे मार्ग अवलंब केले तर तेली समाज सुसंघटित होऊन, त्याची मजबूत संघटना पुन्हा उभी राहू शकेल, मात्र हे करताना अंहमला तिलांजली द्यावी लागेल ती तयारी नेतृत्वाला ठेवावी लागेल" मी डोळे मिटून अश्वत्थामाला नमस्कार करून स्तब्ध उभा राहिलो .डोळे उघडले तेव्हा हसत मागे वळून पाहणारा अश्वत्थामा मला दिसला. आणि माझी झोप उडाली   

ll जय संताजी ll

दिनांक 26-08-2022 00:47:23
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in