
संत संताजी महाराजांचे अभ्ांग आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
अंगी जोडियेला मन पावनाचा ॥1॥
भक्ती ही भावाची लाट आयकली ।
शांती शिळा ठेवली विवेकाची ॥2॥
सुबुद्धीची वाट लावेनि विकास ।
प्रपंच जोखड खांदी घेतियली ॥3॥
फेर फिरू दिले जन्मावरी ।
तेलकाढीले चैतन्य ते ॥4॥
संतू म्हणे मी हे तेल काढीयले ।
म्हणुनी नाव दिले संतु लेली ॥5॥
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade