श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी शिरपूर येथे संपन्‍न

कष्टकरी चौधरी समाजाने उज्वल भविष्यासाठी आपल्या मुलामुलींना उच्चशिक्षित करावे : आ. अमरिशभाई पटेल

     शिरपूर : चौधरी समाज कष्टकरी असून सर्व समाज बांधवांनी आपल्या मुलामुलींना उच्चशिक्षित करुन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी गेल्या ३५ वर्षांपासून मी अहोरात्र काम करित आहे. नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरविला आहे. यापुढे देखील तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. तालुक्यात शांतता अबाधीत राहण्यासाठी माझ्यासह सर्वांनी कायम प्रयत्न करावे. शिरपूर शहर नेहमीच स्वच्छ व प्रदूषण मुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

Shri Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi Shirpur    श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी चौधरी समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ८ वाजता संत श्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल
यांच्या हस्ते तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

Shri Santaji Jagnade Maharaj punyatithi Shirpur    यावेळी आ. अमरिशभाई पटेल पुढे म्हणाले की, शिरपूर शहर हे खान्देशात शैक्षणिक हब म्हणून नावारूपास आले आहे. तालुक्यात ३७ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्याचा सार्थ अभिमान आहे. चौधरी समाजातील मुलामुलींची आयआयटी, आय आय एम साठी निवड होते ही माझ्यासकट शिरपूरकरांसाठी कौतुकाची बाब आहे. उज्वल भविष्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तालुका सुखी- संपन्न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिरपूर पॅटर्न मार्फत तालुक्यात ३५० पेक्षा जास्त बंधाऱ्यांची निर्मिती करून १ लाख एकर कोरडवाह जमिन ओलिताखाली आणली आहे. एस. व्ही. के. एम. संस्थेचे ५०० कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक व भव्य हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मनापासून प्रयत्न सुरु आहेत. शहरातील प्रत्येक भागात पाणी, काँक्रीट रस्ता आणि वीज या सर्व मूलभूत सुविधा पुरविल्या असून कोणत्याही सुविधांपासून नागरिक वंचित राहणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत. प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले. यावेळी बबनराव चौधरी तसेच पोलीस निरीक्षक अनसाराम आगरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

    व्यासपीठावर आमदार अमरिशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, चोपडा नगराध्यक्ष जीवन चौधरी, धुळे जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जि. प. सदस्य संजय पाटील, शिवसेनेचे कन्हैया चौधरी, मनसेचे राकेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, न. पा. शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल, गोपाल भंडारी, भरत पाटील, माजी नगरसेवक अशोक कलाल, जगतसिंग
राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, मर्चंटस् बँक संचालक महेश लोहार, नितीन गिरासे, राजेश सोनवणे, राजू शेख, भटू माळी मांडळ, जयराम चौधरी, अर्जुन चौधरी, राजेंद्र चौधरी, जगदीश चौधरी, संतोष चौधरी, रमेश चौधरी, शामकांत ईशी, संजय चौधरी, सुरेश रावजी चौधरी, ईश्वर चौधरी, महेश चौधरी, दुर्गेश चौधरी, मोहन चौधरी, नरेश चौधरी, युवराज चौधरी, चंद्रवर्धन चौधरी, जितेंद्र चौधरी, योगेश चौधरी, विजय भालचंद्र चौधरी, उत्तम चौधरी, सुरेश देविदास चौधरी, विजय हिरामण चौधरी आदी उपस्थित होते.

    याप्रसंगी चौधरी समाजातील विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या युवक, युवती आणि भगिनींचा आ. भाईच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सकाळी ११ वाजता करवंद नाका येथील अनाथ मुलांच्या वसतिगृहात अन्नदान करण्यात आले. दपारी वरझडी रस्त्यावरील नियोजित तेली भवनाच्या जागेवर संताजी जगनाडे यांच्या फलकाचे अनावरण समाजाचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता चौधरी गल्ली येथून संताजी जगनाडे यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक हेडगेवार रोड, पाचकंदिल, मारवाडी गल्ली, कुंभारटेक, खाटीक चौकमार्गे चौधरी गल्लीत पोहचली. या मिरवणूकीत चौधरी समाजाचे युवक, युवती आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री ९ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन संदिप चौधरी यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील चौधरी समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत जगनाडे उत्सव समितीचे अध्यक्ष संजय चौधरी, उपाध्यक्ष सुनिल चौधरी, प्रशांत चौधरी, कोषाध्यक्ष आशिष चौधरी, सचिव भगवान चौधरी, संघटन प्रमुख संदीप चौधरी, सह सचिव चेतन चौधरी, रविंद्र चौधरी, दीपक चौधरी, दिनेश चौधरी, राकेश चौधरी, चेतन चौधरी, मनोज चौधरी, जयेश चौधरी, किशोर चौधरी, आकाश चौधरी, प्रकाश चौधरी, हेमंत चौधरी, योगेश चौधरी आदींनी संयोजन केले.

दिनांक 03-01-2023 09:06:41
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in