चांदवड : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित नाशिक विभागीय पदाधिकारी बैठकीत चांदवड तालुक्यातील व शहरातील विविध आघाड्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सचिव प्रा. भूषण कर्डिले यांच्या आदेशाने व नूतन विभागीय अध्यक्ष अॅड. शशिकांत व्यवहारे, जिल्हाध्यक्ष समाधान चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. अनिता पवार, चांदवड तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुंखे आदींच्या उपस्थितीत विविध आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी चांदवड तालुका उपाध्यक्ष संतोष पगार, चांदवड तालुका महिला आघाडी अध्यक्ष सिंधु व्यवहारे, संताजी महिला मंडळ चांदवड शहर अध्यक्ष अनिता खैरनार, संताजी महिला मंडळ चांदवड शहर उपाध्यक्ष बेबी साळुंखे, युवक चांदवड शहर अध्यक्ष मयूर व्यवहारे, चांदवड वकील आघाडी अध्यक्ष अॅड. विशाल व्यवहारे, चांदवड व्यापारी आघाडी अध्यक्ष नीलेश जाधव, चांदवड सेवा आघाडी अध्यक्ष संदीप महाले, चांदवड वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. सुनील आहेर ( वडनेर भैरव) आदी मान्यवरांची निवड करून त्यांना नाशिक येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे समाजाचे अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष गोटू वाघ, दत्तात्रय राऊत, दीपक व्यवहारे, सचिन (गुड्डू) खैरनार, रामदास शिरसाट, लक्ष्मण लुटे, किशोर बोरसे, किशोर व्यवहारे, दत्तू सोनवणे, सागर सूर्यवंशी, प्रकाश सोनवणे आदींसह समाजबांधवांनी अभिनंदन केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade