श्री कौपिनेश्वर न्यास ठाणे संस्थेने आयोजित केलेल्या गुढी पाडवा नव वर्ष स्वागत शोभा यात्रेत सहभागी झालेल्या ठाणे महानगर तेली समाज यांच्या तृण धान्याचे महत्त्व या चित्र रथास तृतीय पारितोषिक जाहीर झाले. साल २०१५ पासुन ठाण्यातील सर्व तेली समाज संस्था एकत्र येऊन ठाणे महानगर तेली समाज या नावाने शोभा यात्रेत सहभागी होत आहेत. पहिल्याच वर्षी उत्तेजनार्थ पारितोषिक लाभले होते.
सदर शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी ठाण्यातील सर्व तेली समाजाच्या स्थानिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. नववर्ष शोभायात्रा समितीचे अध्यक्ष श्री जयवंत रसाळ, कार्याध्यक्षा सौ श्रद्धा महाडीक, समन्वय सचिव श्री विलास निवृत्ती घोंगते, तसेच स्थानिक संस्थांचे अध्यक्ष श्री संदीप तेली, श्री संतोष रहाटे, श्री किरण चौधरी, श्री जयेश चौधरी तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शोभा यात्रा सहभाग यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने मेहनत घेतली.आथिर्क व वस्तू रूपाने देणगी देऊन ठाणे व इतर गावातील समाज बंधू भगिनी यांनी विशेष सहकार्य केले त्या सर्वांना धन्यवाद
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade