छत्रपती संभाजीनगर, दि. १५ - अखिल भारतीय तैलिक महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मनोज संतान्से यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. मनोज संतान्से यांनी महाराष्ट्रासह मराठवाड्यात तेली समाजाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होत सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मराठवाड्यातील कार्यकर्त्याचा एकप्रकारे गौरव करण्यात आला. या समितीत देशभरातून समाजसेवकांची निवड केली जाते, यामध्ये संभाजीनगरच्या मनोज संतान्से यांच्या निवडीने त्यांच्या कार्याची पावती मिळाली आहे. महाराष्ट्रातून अखिल भारतीय तैलिक महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर मनोज संतान्से यांची नियुक्ती झाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade