नागपूर:- विदर्भ तेली समाज महासंघ आणि शंबुक संताजी डॉ मेघनाथ साहा प्रबोधन मंच आणि अमर सेवा मंडळ नागपूर द्वारा आयोजित विद्यापीठ स्तरीय विविध प्राधिकरणावर निवड नियुक्त झालेल्या सन्माननीय सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम कमला नेहरू महाविद्यालयाचे सभागृह सक्करदरा चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. रघुनाथ शेन्डे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.श्रीरामजी कावळे प्र-कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विशेष अतिथि मा.डॉ. प्राचार्य सुनील साकुरे अधिष्ठाता गोड़वाना विद्यापीठ गडचिरोली,डॉ.नामदेवराव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ ,डॉ.सतीश चापले महामंत्री शिक्षण मंच नागपूर सदर मान्यवरांच्या हस्ते सत्कामूर्तीना भारतीय संविधान, स्मरणिका आणि स्मृती चिन्ह देवून नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर निवड झालेल्या विदर्भ तेली समाजातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी शिवराम गिरिपुंजे ,शेषराव गिरीपुंजे , डॉ. प्रकाश देवतळे , प्रा.रमेश पिसे , प्राचार्य पुषोत्तम बोरकर, कृष्णा बेले यांची प्रामुखाने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात संताजी जगनाडे महाराज आणि जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. मेघनाघ शहा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मागदर्शन करताना प्र -कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले की गोड़वाना विद्यापिठामध्ये संताजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करण्याचे प्रत्येन करुन तसेच इतर शैक्षणिक उपक्रम राबवून समाज प्रबोधनात्मक कार्य करु असे प्रतिपादन केले. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सतीश चाफले यांनी बोलतानी सांगितले की संत जगनाडे महाराज यांच्या जिवन चरित्रावर आधारित अध्यासन केंद्र सुरू करणे व संताजी महाराजांच्या नावाने स्वर्ण पदक सुरु मॅनेजमेंट कौशिलच्या परवानगीने सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला .यावेळी डॉ. सुनील साकोरे यांनी समयोचित मागदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात रघुनाथ शेन्डे यांनी समाजाला समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वानी प्रत्येन करावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. नामदेवराव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज यांनी विदर्भ तेली महासंघाच्या मागील२५ वर्षाच्या कार्याची माहिती देवून पुढील भविष्यात अनेक उपक्रम राबविण्या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रा. संजय निंबेकर यांनी आभार प्रदर्शन उमशे कोराम यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधान परिषद सदस्य अँड अभिजीत वंजारी यांच्या मार्गदर्शनात संजय शेंडे, संजय नरखेडकर, संजय सोनटक्के, प्रा.सुधीर सुर्वे, संजय भलमे प्रेमानंद हटवार, अनिल घुसे, सुभाष काळबांधे, सुरेश वंजारी, राजेंद्र डकरे ,प्रशांत मदनकर, ज्ञानेश्वर लांजेवार, आनंद नासरे, दिनकर गायधनी, दीपक खोडे, राम कावडकर , मार्गेश्वर हटवार, अनुज हुलके, शंकर ढबाले, अँड चंदशेखर घाटोळे, शुभांगी घाटोळे, श्रीमती मीरा मदनकर, डॉ.चंद्रप्रभा हटवार , निशाताई हटवार यांनी परिश्रम घेतले .
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade