समर्पण फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या सौजन्याने १० (दहावी) उत्तीर्ण गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांकरिता आर्थिक शिष्यवृत्ती योजना समर्पण फाऊंडेशनच्या “श्री. संताजी महाराज शिष्यवृत्ती” योजनेनुसार समाजातील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांकरिता १० वी च्या बोर्डाच्या मार्च २०२३ मध्ये झालेल्या परिक्षेत ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता व ज्यांच्या कुटुंबाचे एकूण मासिक (दरमहा) उत्पन्न रू. ३०,०००/- पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांकरिता ११ वी करिता रूपये ५०००/- व बारावीकरिता रूपये ५०००/- शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. बारावीकरिता शिष्यवृत्ते मिळण्याकरिता ११ वीच्या परिक्षेत ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक आहे. ज्या पालकांचे मासिक उत्पन्न रू. ३०,०००/- पेक्षा जास्त आहे, त्यांनी अर्ज करू नये. उत्पन्नाची शहानिशा केली जाते.
ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी व समाजबांधव महाराष्ट्रातील शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थीच पात्र असतील. तरी अशा विद्यार्थ्यांनी आपले अर्ज त्यांच्या सर्व माहितीसह, गुणपत्रिका व उत्पन्नाचा दाखल्यासह पगाराचे पत्रक, अथवा आयकर पत्रक, दोन फोटो व स्वतःचा व पाल्याचा संपर्क क्रमांकासह तसेच अर्जामध्ये पालकांना ओळखणा-या समाजातील ३ व्यक्तींची नावे व मोबाईल क्रमांक लिहीणे आवश्यक आहे. सदरच्या व्यक्ती त्यांच्या गावातीलच असाव्यात. खालील पत्त्यावर अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे पाठवावेत, प्रत्यक्ष येऊ नये, ही नम्र विनंती. गुणवत्तेनुसार प्रथम ३० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३०/०९/२०२३ आहे.
संपर्क :- श्री. डी. एस. करडिले, मे. कलशा बिल्डर्स प्रा. लि. अ-१, आशियाना, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई - ४००७०५. मो.नं. ९८६७०६६६२२ (संपर्काची वेळ सकाळी ११.३० वा. ते संध्याकाळी ७.०० पर्यंत) आपण वरील मोबाईल नंबरवर संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त श्री. डी. एस. करडिले यांच्याकडे संपर्क साधावा, ही नम्र विनंती. आवाहन :- समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांना आवाहन करण्यात येते की, सदर योजनेत विद्यार्थी कायमस्वरूपी दत्तक घेण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष श्री. डी.एस.करडिले यांना वर नमुद मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade