वालसावंगी येथे शुक्रवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात गावातील मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षक हरीभाऊ वेनडोले, माजी सभापती लक्ष्मण मळेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख किरणराजे कोथलकर, ह. भ. प. मोरे महाराज, केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल अस्वार यांनी भाषणातून संत जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथलकर, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, अजिंक्य वाघ, नयन वाघ, संजय कोथलकर, फकिरा शिरसाठ, बाळू आहेर, कृष्णा शिरसाठ, गणेश पवनकर, निलेश मालोदे, सचिन वेनडोले, फकिरा शिरसाठ, डॉ. सुनील रत्नपारखी, मनोहर पवनकर, धीरज शिरसाठ, वसंत पंडित, सुनील जोडपे, आकाश पंडित, कृष्णा डोमळे, यांच्यासह अनेक समाजबांधव व ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वेनडोले यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष मालोदे यांनी मानले. ग्रामपंचायत कार्यालयात देखील संत जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade