तिळवण तेली समाज ट्रस्ट, रजि. नं. अ / ४६३ श्री संताजी भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तेली पंचाचा वाडा, दाळमंडई, अहमदनगर च्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जगदगुरू श्री तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा - (वर्ष ५० वे), सालाबादप्रमाणे मंगळवार दि. २/१/२४ ते मंगळवार दि. ९/१/२४ या कालावधीमध्ये श्री तुकाराम महाराज गाथ्यांचे लेखक राष्ट्र संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प. श्री. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित केला आहे.
मंगळवार दि. ०९/०१/२०२४ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० वा. ह.भ.प. श्री रामदास महाराज क्षीरसागर यांचे गुलालाचे किर्तन होईल. त्यानंतर सकाळी ११ वा. मिरवणुक होईल. मिरवणुकीनंतर संताजी महाराज मुर्तीची पूजा व आरती होऊन पुष्पवृष्टी करण्यात येईल.
टिप - दरारोज चे कार्यक्रम पहाटे ५ ते ७ काकडा भजन दुपारी ४ ते ५ नामजप व सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ होईल. टीप- श्री संताजी महाराजांच्या सेवे प्रित्यर्थ अखंड विना पहारा करण्याची सर्व समाज बांधवांना विनंती. तसेच कार्यक्रमपित्यर्थ महाप्रसादाचे आयोजन दुपारी १ ते ४ वा. करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बांधवांनी संताजी महाराजांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अव्हान तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade