जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरूम तालुका उमरगा येथे आज दिनांक ८/१२/२०२४ रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तुकारामाची अभंगवाणी या ग्रंथाचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार देशमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण अंबुसे,अप्पू साखरे,सचिनअंबुसे यांच्या शुभहस्ते करून अभिवादन केले.

नवीन पिढीला चांगल्या संस्कारांची गरज आहे.संताजींचे विचार त्यांची पुस्तके वाचण्यासाठी आवड निर्माण केली पाहिजे.यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे ,असे प्रतिपादन श्री. विजयकुमार देशमाने यांनी केले. बोलताना पुढे म्हणाले की,संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या एक टाळकऱ्यापैकी एक टाळकरी संताजी जगनाडे महाराज होते.त्यांची बुध्दी अत्यंत चाणाक्ष होती.संताजी महाराज यांच्या स्मरणशक्ती व बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग मुखोदगद केले होते.आज आपल्या समोर तुकाराम महाराज यांची अभंगगाथा फक्त संत संताजी जगनाडे यांच्या लिखाणामुळे आहे.संताजींचे विचार लहान - थोरांपर्यंत पोहचले पाहिजेत. "मानवता हाच खरा धर्म " असा संदेश देणाऱ्या संताजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांनी अंगिकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी मुरूममधील शंकर अंबुसे,पप्पू मुळजकर,संदीप अंबुसे , सदाशिव अंबुसे, जयंती नियोजन कर्ते शिक्षक राजू पवार,उत्कृष्ट फलक लेखन केलेले कलाशिक्षक श्री.नागनाथ कामशेट्टी,श्रीमती परीट मॅडम,शालेय पोषण आहार मदतनीस धनराज इरकल आदी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे आधारस्तंभ श्री. शिवाजी कवाळे सर मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade