जालना ( प्रतिनिधी ) तेली समाज हा ओबीसी समाजातील एक महत्त्वाचा घटक असून हा समाज कष्टकरी व स्वाभिमानी समाज म्हणून ओळखल्या जातो महाराष्ट्रामध्ये हा समाज सर्वदूर विखुरलेला आहे आणि जालना शहर व ग्रामीण भागात हा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यरत असून परंतू समाजातील जे खरोखर खरे गरजू समाज बांधव आहेत ज्यांच्या कडे अर्थिक बळ नाही शारीरिक बळ नाही शिक्षणाचं बळ नाही आशा गरजू समाज बांधवांना सरकारी योजनांचा लाभ मिळून देणं हाच आपला उद्देश आहे.
शिक्षणाचा अभाव व पैसा नसल्याने आशा लोकांमध्ये योजनेचा लाभ घेण्याची क्षमता नसते त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी जालना तेली सेना महिला आघाडी ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार आहे.
आपण जिथे राहतो तिथे असं कोण लोक आहेत की त्यांना योजनेचा लाभ मिळून देणं आपल्याला योग्य वाटतं आशा लाभार्थांचा शोध घेऊन त्यांना सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकारी योजनांचा लाभ मिळून देणं हेच आपल्या कामाचे महत्त्वाचं उद्दिष्ट व लक्ष आहे.
या निमित्ताने आपल्याला समाजा पर्यंत पोहचता येते समाजाच्या सुखा दुःखात सहभागी होता येते समाजाचं सुखदुःख आपल्याला योग्य ठिकाणी पोहचविता येते याच बरोबर महिलांना व नवतरुणांच्या उद्योग धंद्यांसाठी शासनाच्या वतीने योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय केल्या जाते याच उद्देशाने समाज बांधवांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे समाज बांधव योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नाही म्हणून या सर्व बाबींचा विचार करून तेली सेनेने पुढाकार घेतला असून शासनाच्या सर्व योजनांचा समाजाला लाभ मिळून देण्यासाठी तेली सेनेच्या वतीने आगामी काळात मार्गदर्शन शिबिरे घेऊन समाज बांधवांना सरकारी योजनांचा फायदा मिळून देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केल्या जाणार आहे.
तेली समाजातील कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तन-मन-धनाने तेली सेनेचे पदाधिकारी हे जनसेवक म्हणून काम करणार असल्याचे तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी स्पष्ट केले ते काल दि.29 रोजी जालना येथील एका हॉटेल मध्ये तेली सेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत बोलत होते.
जालना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ.ज्योती मगर यांनी समाजाच्या अनेक प्रश्नांवर आपले विचार व्यक्त करून समाजातील सर्वांना सोबत घेऊन आम्ही समाज सेवेचा इंद्रधनुष्य तयार करु आशा भावना व्यक्त केल्या.
जालना महिला शहर अध्यक्ष सौ.पूजा क्षीरसागर यांनी महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थाने परिश्रम घेतले असून त्यांनी समाज संघटन मजबूत असल्यास आपल्याला कोणतेही कार्य सहजपणे करता येतात अशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या
सौ. सुंनदा आबोले यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून एकदिलाने समाजाचं कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
सौ. मुक्ता मसुरे यांनीही समाजासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला या वेळी संवाद बैठकीला गणेश पवार, श्रीराम कोरडे, सुभाष वाळके, प्रभाकर गाजरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.लंका सोनवणे, ज्योती मगर, पूजा क्षीरसागर, मुक्ता मसुरे, सुनंदा आबोले, छाया चौधरी, ज्योती बुजाडे, अश्विनी सोनवणे, वर्षा काळे, अमृता भालेराव, रूपाली क्षीरसागर, तारा पंडीत, सुनिता पवार, निकिता काळे, आदींची उपस्थिती होती.