संत संताजी पुण्यतिथी 317 वी सुंदुंबरे

Janardhan jagnade shri santaji maharaj jagnade sanstha adhyaksh

   चाकण - प्रिय समाज मित्रांनो व माता पिता बंधु भगिनी 2012 ते 2016 या 4 वर्षाींच्या कारकिर्दीत 4 महोत्सव (पुण्यतिथी ) पार पडली संत शिरोमणी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव 317 वर्षे पुर्ण झाली आपण सर्व जण जाणता आहात. जगद्गुरू तुकाराम महाराज संत शिरोमणी संताजी यांच्या अनमोल रत्नांच्या ज्ञानाचा या जगाला विशेष करून वारकरी संप्रदायाला संताजी महाराज लिखीत तुकाराम गाथेने फर मोठे मान प्राप्त झाले यापुढे ही होत राहील आशी परमेश्‍वर चरणी प्रार्थना करतो.

    छत्रपतींच्या शिवकालीन खंडापासुन या संताजी महाराजांनी फार मोठी जबाबदारी घेऊन पुर्ण मदत केली. यात तुकोबाराय संताजी जगनाडे महाराज, गवारशेठ वाणी, गंगाधर पंत मवाळ व अन्य सर्व संतानी मौलीक योगदान दिले. त्या संताजी महाराजांच्या संजिवन समाधी मंदिराच्या व तेली समाजाचा अध्यक्ष म्हणुन मला संधि मिळाली त्या संधिचे सोने करण्यावर मी व माझे सर्व सहकारी प्रयत्न करित आहोत एक शतका पुर्वी या समाजातील दानशुर व्यक्ती रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे यांनी ज्या वेळेस पुणे ते सुंदुंबरे या मार्गावर कुठलेही दळण वळणांचे साधन नसताना सुंदुंबरे येथे संताजी जगनाडे महाराजांचे समाधी मंदिर बांधले त्यांना प्रथम मी वंदन करतो.

    मागिल सर्व अध्यक्षांनी व पदाधिकारी यांनी हि व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आमही सर्व पदाधिकारी काम करित आहोत. पुर्वीचे अध्यक्ष रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे, डी.बी. भागवत, बबनराव खळदे,  गोपाळशेठ जगनाडे, दहितुले महाराज, प्रभाकर डिंगोरकर, अंबादास शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी कलेल्या कार्याचा वारसा मोठ्या जबाबदारीने आम्ही पुढे चालवत आहोत.

    जुने जिर्ण झलेल मंदिर नव्याने उभारले गेले शासनाच्या निधीतुन अपुर्ण अवस्थेत असलेले मल्टी पर्पज हॉल व किचन हॉल (प्रशस्त) याची पुर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. ति समाज बांधवाच्या निधीतुन शासनाकडुन अपुर्ण आलेला निधीतुन ही कामे अशक्य आहेत तरी ही समाज बांधवांनी सढळ हाताने मत करून या विकासास हातभार लावावा. महाराष्ट्रातील समाजाचे एकच संत होऊन गले आहेत. त्यांचे स्मारक चिरंतन रहावे अशि प्रत्येक प्रत्येक बांधवाची इच्छा आहे. परंतु प्रत्येक बांधवाने सढळ हाताने मदत केल्यास हे. काम अवघड नाही. तिर्थ क्षेत्र आणि पर्यटन होणे गरजेचे आहे. जेणे करून संपुर्ण समाज बांधव व भक्तगणांची पावले या समाधी मंदिराकडे वळतिल सुंदर मंदिराचा परिसर आकर्षक हिरवेगार पर्यटन स्थळ सर्व सुविधांनी युक्त उभे करायंचे आहे ते तुमच्या मदतिने.

    संताजी महाराजांचे जिवन शिल्प साकारायचे आहे. संताजींचे - लिखान, अभंग चरित्र वारकर्‍यांपर्यंत पोहचवायचे आहे. हे सर्व करण्यासाठी मोठा निधी उभा करायचा आहे. उत्पन्नाचे साधन करायचे आहे. तिर्थक्षेत्र पर्यटन विकास बालोद्यान, नाना नानी पार्क, धार्मीक अभ्यास, भक्ती निवास, सर्व सुविधायुक्त करायचे आहे. कमित कमी 11 कोटींंचे खर्चाचे अंदाज पत्रक आहे.  शेतीतुन कुठल्याही प्रकारचा नफा नाही अथवा तोटा नाही. स्थापन केलेल्या घटना समिती अ‍ॅड. राजेश येवले व सदस्यानी चांगल्या प्रकारे दुरूस्ती सुचविली आहे. शिक्षणसमिती - मुख्य सचिव बाळासोा. शेलार यांनी देखील सहकार्‍यांसमवेत चांगला कारभार चालु आहे.

    महाराष्ट्राच्या सर्व भाविक व समाज बाधवांनी या विकासास हातभार लावल्यास चांगला सुवर्ण परिसर निर्माण करू शकतो जेणेकरून महाराष्ट्रातुनच काय परंतु देशातुन या ठिकाणी भाविक आकर्षीत व्हावेत तसेच समाज बांधव आकर्षित व्हावेत. 

    पुढील उत्सव अध्यक्ष श्री. पांडुरंग जगनाडे व स्वागत अध्यक्ष प्रमुख श्रीमती सुनीताताई नेराळे  यांची निवड झाली.

    सर्व पोटजाती (तेली) एकत्र येऊन ही वज्र मुठ बांधल्यास हा विकास अवघड नाही. 

जय संताजी 
श्री. जर्नादन गोपाळशेठ जगनाडे, अध्यक्ष श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुंदुंबरे

दिनांक 11-02-2016 18:15:03
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in