अहिल्यानगर - संताजी विचार मंच (ट्रस्ट) अहिल्यानगर, अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज आणि प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नववा भव्य मोफत राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे.

महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या ऐतिहासिक अहिल्यानगर शहरातील अत्याधुनिक व सुंदर माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पूर्ण वातानुकूलित हॉल, सुसज्ज बैठक व्यवस्था, मोफत नाश्ता, चहा-पाणी, जेवण आणि प्रशस्त पार्किंगची सोय असणार आहे. सर्व समाज बंधू-भगिनींना प्रवेश पूर्णतः मोफत राहणार आहे.

मेळाव्यात मल्टिकलर वधू-वर पुस्तिकेचे वितरण होईल. ही पुस्तिका फक्त मेळाव्यात उपस्थित पालकांना मोफत मिळेल. ज्यांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांनी ५०० रुपये भरून ती घेता येईल (कुरियर खर्च वेगळा).
ऑफिस : संताजी विचार मंच C/o देवकर फर्निचर, श्री सोमनाथ नारायणशेठ देवकर नेताजी सुभाष चौक, अहिल्यानगर संपर्क : ९८५०५०७३१३ / ९८५०४६४९४९
हा मेळावा अहिल्यानगर शहर तसेच नगर, श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, कोपरगांव, नेवासा, श्रीगोंदा, शेवगांव, राहाता, कर्जत, अकोले, पारनेर तालुक्यांतील तेली समाज बंधूंसाठी विशेष सोय आहे.
आपल्या मुला-मुलींचा योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्णसंधी आहे. ज्यांच्याकडे यंदा वधू-वर नसतील तरी नातेवाईक, मित्रांचे फॉर्म भरून पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सर्व समाज बंधू-भगिनींनी सपरिवार उपस्थित राहून मेळाव्याला ऐतिहासिक यश मिळवून द्यावे, ही विनंती करण्यात आलेली आहे !
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade