धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त यंदा विशेष उत्साह दिसत आहे. मंडळाने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दोन भव्य स्पर्धांचे आयोजन केले आहे – रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा. या स्पर्धा संताजी महाराजांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि समाजातील मुलांना सांस्कृतिक वारसा जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे.

रंगभरण स्पर्धा स्पर्धेचे ठिकाण : गुरू शिष्य स्मारक, राजवाडे बँक जवळ, धुळे वेळ : सकाळी ९ वाजता वय गट : सर्व मुले सहभागी होऊ शकतात
निबंध स्पर्धा विषय : “महाराष्ट्रातील संतांची शिकवण” शब्द मर्यादा : ३०० शब्दे फॉर्म सादर करण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ मुख्य कार्यालय, कैलास दुध डेअरी, ग.नं. ४, चैनिरोड, धुळे संपर्क : ९९२२५८९९९९ / ९५४५०४२७५४ नोंदणीची अंतिम तारीख : फॉर्म घरून लिहून पाठवायचा आहे
स्पर्धेतील सर्व सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. दोन्ही स्पर्धेतील प्रथम ११ विजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. बक्षिस वितरण व अभिवादन सोहळा सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता गुरू शिष्य स्मारक जवळ आयोजित करण्यात आला आहे.
आयोजन समितीचे प्रमुख श्री. राजेंद्र माधवराव बागुल (समिती प्रमुख) – ९४२२७८०३८३ श्री. विनोदभाऊ राजू चौधरी (धुळे जिल्हा उपाध्यक्ष) श्री. छोटू श्रावण चौधरी (उपप्रमुख) – ९४२३२८८०५० श्री. राजेंद्र भाईदास चौधरी (उपप्रमुख) – ९६८९०५३४१६ श्री. नितीन मोतीलाल चौधरी (उपप्रमुख) – ९८२३१२७६४७ श्री. प्रमोद महादू चौधरी, श्री. गजानन एकनाथ चौधरी, श्री. नटराज बाबुलाल चौधरी, श्री. रविंद्र वसंत चौधरी, श्री. शाम रामदास चौधरी, श्री. किसन तुळशिराम थोरात
मंडळाचे प्रमुख पदाधिकारी कैलास आधार चौधरी (अध्यक्ष), रविंद्र जयराम चौधरी (सचिव), मनोज मधुकर चिलदे (कार्याध्यक्ष), जयवंत रामदास चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, किरण श्रीराम बागुल, चंद्रकांत श्रीराम चौधरी, राजेंद्र भटू चौधरी, अमोल हिरामण चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेहनतीने हे आयोजन यशस्वी होणार आहे.
खान्देश तेली समाज मंडळाने सर्व समाज बंधूंना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांचा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून संताजी महाराजांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास हातभार लावा.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade