नागपूर - राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे समकालीन, त्यांच्या अभंग गाथेचे पुनर्लेखन करणारे आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने अतिशय आदरपूर्वक साजरी करण्यात आली. पार्टीच्या ‘कहीं हम भूल न जाए’ या राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून संताजी चौक येथील संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नेतृत्व बसपाचे माजी प्रदेश प्रभारी कृष्णा बेले यांनी केले. त्यांच्यासह प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी हर्षवर्धन डोईफोडे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबले, माजी नागपूर अध्यक्ष संजय इखार, कैलास गायधने यांनी संताजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. यावेळी तनुजा गजभिये, चित्रा मेश्राम, नरेंद्र शेंडे, सदानंद जामगडे, विजय डाफडे, हर्षल सातफडे, अभय डोंगरे, सत्यवान मेश्राम, शामराव तिरपुडे, सिद्धार्थ रामटेके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांसोबत ७५ वर्षे निस्वार्थ सेवा केली, १३ दिवस उपास करून इंद्रायणी नदीतून अभंग कोरडे बाहेर काढले आणि मनुवादी सत्तेला आव्हान दिले. त्यांचा समता, भक्ती आणि अन्यायाविरुद्धचा संदेश आजही लाखो दलित-बहुजनांना प्रेरणा देतो. बसपाच्या या अभिवादनाने संताजी महाराजांच्या कार्याला नवे मानांकन मिळाले आणि बहुजन समाजात एकतेचा संदेश गेला.
कार्यक्रमात उपस्थितांनी संताजी महाराजांच्या अभंगांचे समूह कीर्तन केले आणि “जय भीम – जय संताजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade