पालघर तेली समाज - नालासोपारा संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकरी सहकाऱ्यांपैकी त्यांची शिष्योत्तम व लेखनिक म्हणून ख्याती असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती. नालासोपारा शहरात सुद्धा या निमित्ताने स्वर्गीय राजीव गांधी विद्यालय वसंत जंगली महाराज सेवा समिती पालघर जिल्हा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे पदाधिकारी भगवान बोरसे ,पांडुरंग नामदेव, अनंत साखरकर, वैभव झगडे, सुधाकर पाटील, रामाकान्त वाघचौरे, पुष्पा बोरसे, सुप्रिया राऊत, विद्यालयाच्या अध्यक्ष सीमा पाटील विश्वस्त निकिता पाटील हितेश पटेल आदी मान्यवर या सभेत प्रामुख्याने उपस्थित होते. रमाकांत वाघचौरे व वैभव झगडे यांनी संत संताजी महाराज यांच्या विषयी उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक व नागरिकांना माहिती दिली. महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी पुष्पा बोरसे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वर्गीय राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade