तळोदा तेली समाज - दोंडाईचा येथील चिमुकलीयर लैगिक अत्याचार करणाच्या नराधमास अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत तळोदा येथील तेली पंच समाज मंडळाने मूक मोर्चा काढून तळोदा येथील नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, दोंडाईचा येथील बालवाडीत शिक्षण घेणाच्या पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सैगिक अत्याचार करुन मारहाण करण्यात आली होती. या अत्याचाराच्या घटनेत मदतीच्या संशयावरुन शाळेतील शिक्षक याला अटक केली असली तरी अत्याचार करणा-याला अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबतचे निवेदन तळोदा येथील नायब तह्सीलदार राठोड यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, झालेल्या घटनेची माहिती मुलीने घरी सांगितल्यानंतर मुलीची आई वडील यांनी याबाबत शाळेतील शिक्षकांनी विचारले असता त्यांनी योग्य ते उत्तर दिले नाही. सदर प्रकार निंदनीय असून समाजाला काळीमा फासणारी आहे. सर्व समाज बांधवांमध्ये याविषयी तीव्र संतापाची लाट आहे. लवकरात लवकर अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणारया लोकांना अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रभाकर चौधरी, योगेश चौधरी, नरेंद्र चौधरी, सुभाष चौधरी, दीपक चौधरी, प्रमोद चौधरी, महेश चौधरी, कल्पेश चौधरी, पुंडलिक चौधरी, भरत चौधरी, आदींच्या सह्या आहेत.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade