धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाजाच्या एका पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा तेलीमहासभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. दोंडाईचा शहरात नूतन विद्यालयात पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. याबाबत शाळा संस्थाचालकांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडितेच्या वडिलांवर दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला. हीबाब अत्यंतसंतापजनक| असून या घटनेतील नराधमांना तत्काळ अटक करण्यात यावी, पॉस्को कायद्यांतर्गत तपास व्हावा. खटला शीघ्र न्यायालयात चालविण्यात यावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. पीडितः मुलीला शासकीय धोरणानुसार तातडीने |मदत देण्यात यावी, पीडितेच्या वडिलांवर दबाब टाकल्याप्रकरणी संस्थाचालक, विद्यालयाचे प्रमुख, कर्मचाच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकान्यांना निवेदन देण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade