सर्व शाखीय तेली समाज विकास मंच व्दारा आयोजित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर प.पु.श्री.अशोकानंद सरस्वतीजी महाराज शिरपुरकर (धुळे) व सर्व समाज मान्यवर संतांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सोमवार दि .16 सप्टेम्बर 2019 ला प्रमिलाताई ओक हॉल येथे सम्पन्न झाला असुन कार्यक्रमाला . १.ह.भ.प.अरुण नायसे महाराज २.ह.भ.प.संजय गासे महाराज ३.ह.भ.प.एकनाथ चोपडे महाराज ४.ह.भ.प.सुरेश अकोटकर महाराज ५.ह.भ.प.रविंद्र खेडकर महाराज ६. ह.भ.प.दिनेश डोईफोडे महाराज ७.ह.भ.प.विनोद नायसे महाराज ८.ह.भ.प.श्रीकांत राऊत महाराज ९.ह.भ.प.वसंता अंबरते महाराज
यांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधन झाले असुन आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार, नातेवाईक मीत्र मंडळीनी याचा लाभ घेतला .व कार्यक्रमाची शोभा वाढवली. असे म्हणतात संताचे स्थान समाजात श्रेष्ठ असुन वंदनीय आहे. समाजाचा आथिर्क, शैक्षणिक व सामाजिक विकास व्हावा यासाठी संतांचा आशीर्वाद व उपदेश आपल्या पुढील वाटचालीस मार्गदर्शक राहील.
कार्यक्रमाच्या आधी महाराजांच्या हस्ते शहराचे आराध्य दैवतं श्री राज राजेश्वर येथे अभिशेक करण्यात आला .व मंदिर ट्रस्ट च्या वतीने महाराजांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .या प्रसंगी तेली विकास मंच चे दिलीपभाऊ शिरसागर , प्रांतिक तैलीक महासभेचे व तेली विकास मंचाचे गजानन बोराळे, श्री राजेश असलंमोल , श्री संजय वानखडे , श्री शशी चोपडे सह समाजबांधव हजर होते .
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade